PM Modi Football Sikkim: PM मोदी गंगटोकमध्ये खेळले फुटबॉल; पहिला गोल अन् तरुणांसोबत जल्लोष! पाहा व्हायरल व्हिडिओ

PM Narendra Modi football video: सिक्कीमच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी गंगटोकमध्ये स्थानिक तरुणांसोबत फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला.
 PM Modi Football Sikkim
PM Modi Football SikkimPM Narendra Modi X
Published on
Updated on

PM Narendra Modi football video

गंगटोक: सिक्कीमच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी गंगटोकमध्ये स्थानिक तरुणांसोबत फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला. केवळ मैदानात न उतरता त्यांनी आपल्या ड्रिबलिंग कौशल्याने उपस्थितांना थक्क केले आणि गोल केल्यानंतर तरुणांसोबत 'हाय-फाईव्ह' देत जल्लोषही केला.

मैदानावरील उत्साह

पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर या फुटबॉल सत्राचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये मोदी निळ्या रंगाच्या स्पोर्ट्स जॅकेटमध्ये दिसत असून, ते चपळाईने चेंडू टोलावताना आणि गोल करताना दिसत आहेत. खेळ संपल्यानंतर त्यांनी मैदानावरील तरुण खेळाडूंसोबत संवाद साधला.

 PM Modi Football Sikkim
PM Modi Speech : दिल की दूरी मिटानी है... म्हणत पंतप्रधानांनी नॉर्थ ईस्ट राज्यांबद्दल केलं मोठं वक्तव्य, काँग्रेसच्या मंत्र्यांवरही घेतलं तोंडसुख

एक्स पोस्टमध्ये PM मोदी काय म्हणाले?

या अनुभवाबद्दल 'X' वर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींनी लिहिले आहे की, "सिक्कीममधील सुंदर सकाळी माझ्या तरुण मित्रांसोबत फुटबॉल खेळण्यासारखा दुसरा आनंद नाही. हे सत्र अत्यंत ऊर्जा देणारे होते."

सिक्कीमच्या विकासासाठी ४ हजार कोटींची भेट

या अनौपचारिक खेळाचा आनंद लुटल्यानंतर, मोदी यांनी सिक्कीमच्या सुवर्ण महोत्सवी राज्य स्थापना दिन सोहळ्याच्या सांगता समारंभाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी सिक्कीमसाठी ४,००० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली. हिमालयीन राज्यांच्या जलद आणि सर्वसमावेशक विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे यावेळी पंतप्रधानांनी सांगितले. सिक्कीमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातील हा दौरा राज्याच्या प्रगतीसाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

 PM Modi Football Sikkim
West Bengal Assembly Election : 'ही माझी शेवटची सभा, आता थेट भाजपच्या शपथविधी सोहळ्यालाच येणार'; पंतप्रधान मोदींचा ठाम विश्वास

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news