Narendra Modi Photo: प्रत्येक बंगालीसाठी... प्रचारातून वेळ काढून पंतप्रधानांचे गंगा (हूगली) फोटो शूट

Narendra Modi Photo
Narendra Modi Photopudhari
Published on

Narendra Modi Photo: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. ते तिथं पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले आहेत. नुकतेच पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले आहेत. मात्र प्रचाराच्या थकवणाऱ्या कार्यक्रमातून देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळ काढून आपल्या फोटोग्राफीची हौस पूर्ण करून घेतली. त्यांनी गंगा नदीची (पश्चिम बंगालमधील हूगली नदी) काही नयनरम्य क्षणचित्रे टिपली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यांनी हूगली नदीकाठी नयनरम्य क्षणचित्रे टिपण्याचा मोह आवरला नाही.

हूगली नदी ही गंगेची एक सहवाहिनी नदी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नदीचे क्षणचित्रे टिपली. त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

या फोटोंना कॅप्शन देत त्यांनी प्रत्येक बंगालीसाठी गंगेचे महत्व सांगितलं.

प्रत्येक बंगालीसाठी गंगा नदी ही नदीपेक्षा बरंच काही आहे. ती आपल्यासोबत जुन्या सभ्यतेचे पाणी वाहून नेते. आज सकाळी कोलकात्यात हूगली नदीसोबत वेळ घालवला.

पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्याचं मदतान झालं असून मतदानाचा टक्का तब्बल १० टक्क्यांनी वाढला आहे. त्याचा फायदा कोणाला होणार याची उत्सुकता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news