

पुढारी ऑनलाईन डेस्क : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबई झोनल युनिटने मुंबईतील एका मोठ्या ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश केला. शुक्रवारी 31 जानेवारी रोजी नवी मुंबई येथून 11.540 किलो उच्च दर्जाचे कोकेन, 4.9 किलो हायब्रीड स्ट्रेन हायड्रोपोनिक गांजा 200 पॅकेट्स (5.5 किलो), कॅनाबिस गमी आणि ₹1,60,000 रोख रक्कम जप्त केली.
या तपासादरम्यान असे उघड झाले आहे की, हे सिंडिकेट परदेशी नागरिकांच्या एका गटाद्वारे चालवले जात होते. जप्त करण्यात आलेल्या काही प्रमाणातील अमली पदार्थ अमेरिकेतून मुंबईत आणले गेले होते. हे ड्रग्ज कुरिअर, लहान कार्गो सेवा आणि मानवी वाहकांच्या मदतीने भारत आणि परदेशातील विविध प्राप्तकर्त्यांना पाठवले जात होते. या कारवाईत आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच, या ड्रग्ज सिंडिकेटचे मागील आणि पुढील संबंध शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती मुंबई नार्कोटिक्स विभागाने दिली आहे.