बंगळूर : मंदिरातील प्रसादात नंदिनी तूप बंधनकारक

कर्नाटक धर्मादाय खात्याचा आदेश ः तिरुपती लाडू वादानंतर निर्णय
Tirupati Laddos
मंदिरातील प्रसादात नंदिनी तूप बंधनकारकPudhari Photo
Published on
Updated on

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा

तिरुपतीतील लाडूच्या प्रसादाबाबत वाद वाढत असताना कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील धर्मादाय खात्यांतर्गत येणार्‍या सर्व मंदिरांमध्ये प्रसादाचे लाडू, अन्य प्रसाद व महाप्रसाद बनवताना तसेच आरती व दिव्यांसाठी नंदिनी तूपच वापरण्याचा निर्णय घेतला आहे. धर्मादाय खात्याने तसा आदेश राज्यातील सर्व मोठ्या मंदिरांसह धर्मादाय खात्याच्या अखत्यारीत येणार्‍या प्रत्येक सर्व मंदिरांना बजावला आहे.

Tirupati Laddos
'तिरुपती लाडू प्रसादाची FSSAI करणार चौकशी', केंद्राकडून गंभीर दखल

आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती मंदिरातील लाडूच्या प्रसादात गाय आणि डुकराची चरबी तसेच माशांच्या तेलाची भेसळ आढळून आल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. यामुळे कर्नाटक राज्य धर्मादाय खाते परिवहनमंत्री रामलिंगा रेड्डी यांनी धर्मादाय खात्याला महत्त्वपूर्ण सूचना दिली आहे. या सूचनेनुसार कर्नाटकातील धर्मादाय खात्याने कोणत्याही खासगी दूध संस्थेत तयार होणारे तूप तसेच अन्य दुग्धजन्य पदार्थ मंदिरातील प्रसादासाठी तसेच महाप्रसादासाठी वापरू नयेत मंदिरात लावण्यात येणारे दिवे, आरती व सेवेच्या काळात वापरण्यात येणारे तूप हे नंदिनीचेच वापरावे, असा आदेश बजावला.

Tirupati Laddos
Tirupati Laddu History| ३०० वर्षांचा इतिहास,५ लाख लाडू, ५०० कोटींची उलाढाल...

राज्यातील अनेक मंदिरांचे वर्षभरात उत्सव होतात, यात्रा भरते तसेच अनेक धार्मिक कार्यक्रम होत असतात. या काळात संपूर्ण उत्सव काळात महाप्रसाद बनवला जातो. याशिवाय काही मंदिरांमध्ये प्रसादाचे लाडू, शिरा अथवा अन्य प्रकारचा प्रसादही बनवला जातो. तो बनवताना आजतागायत कोणते तूप वापरले जात होते, हे त्या-त्या मंदिर व्यवस्थापनावर अवलंबून होते. परंतु, आता तिरुपती लाडू वाद समोर आल्यानंतर धर्मादाय खात्याच्या आयुक्तांनी प्रसाद व महाप्रसादाचा दर्जा उत्तम राखण्याबरोबरच नंदिनीचे तूप वापरण्याची सूचना मंदिर व्यवस्थापंनाना केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news