

पुढारी ऑनलाईन डेस्क : झारखंडमधील गोड्डा मतदारसंघाचे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केलेल्या सर्वोच्च न्यायालयावरील टिपण्णीवरुन देशभरातून तीव्र प्रतिक्रीया उमटत आहेत. आता दुबे यांच्या विधानावर समाजवादी पक्षाचे नेते व खासदार अखिलेश यादव यांनींही प्रतिक्रीया दिली आहे. भाजपाच्या जर ४०० च्यावर खासदार निवडूण आले असते तर देशात रस्त्यावंर तलवारींचा व रायफलींचा नंगानाच बघायला मिळाला असता. अशा शब्दात त्यांनी थेट भाजपावरच निशाणा साधला आहे. दुबे यांनी सर्वोच्च न्यायालयामूळे धार्मिक युद्ध भडकवले जाते असे वक्तव्य केले होते. भाजपाने मात्र त्यांचे हे मत वैयक्तिक असू शकते, असे म्हणत सारवासारव केली आहे.
रविवारी प्रयागराज येथे एका प्रेस कॉन्फरसमध्ये त्यांनी भाजपावर हल्ला चढवला. त्यांनी म्हटले की धार्मिक आणि जातीय हिंसा वाढवण्याचे काम हे केवळ भाजपामुळेच सुरु आहे. प्रत्येक वेळी भाजपकडून ‘डिव्हायड ॲन्ड रुल’ ही निती अवलंबली जात आहे. कधी धर्माच्या नावाने तर कधी जातीच्या नावे दंगे भडकवण्याचे काम हे केवळ भाजपच करत आहे.
भाजपाच्या नितीवरी यादव यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजप केवळ हिसकावून घेणे एवढेच करत आहे. वक्फ सुधारणा कायदा त्याचाचा एक भाग आहे. हा कायदा करुन भाजपकडून जमीनी बळकावण्याचे षडयंत्र रचले जात आहे. ही पार्टी भू-माफिया आहे असा थेट आरोपही मुलायमसिंग यांनी केला.
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील हिंसाचार हा भाजपाच्याच लोकांनी केला असल्याचा आरोपही अखिलेश यांनी केला आहे. उत्तरप्रदेशातील कन्नोज येथे दंगे करण्यासाठी कारणीभूत असलेले भाजपाचे १७ लोक तुरुगांत गेले आहे. देशाचा इतिहास जसा आहे तसाच राहू द्यावा तो बदलण्याचा प्रयत्न करु नये असा सल्लाही शेवटी यादव यांनी दिला