

पुढारी ऑनलाईन डेस्क : Murshidabad Violence : प. बंगालमध्ये वक्फ संशोधन कायद्याविरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान मुर्शिदाबाद जिल्ह्यात झालेल्या हिंसाचारप्रकरणी पश्चिम बंगाल 'एसटीएफ'ने ओडिशात १२ संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला मुर्शिदाबाद जिल्ह्यात हिंसाचार झाला होता. यामध्ये पिता-पुत्रासह तीन जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी या प्रकरणाच्या तपासासाठी पश्चिम बंगाल सरकारने विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. या नऊ सदस्यीय एसआयटीचे नेतृत्व डीआयजी (मुर्शिदाबाद रेंज) करणार आहेत. पथकात गुप्तचर शाखेचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक, सीआयएफ आणि सीआयडीचे दोन उपाधीक्षक, चार निरीक्षक, ट्रॅफिक पोलीस निरीक्षक आणि सुंदरबन पोलीस जिल्ह्याच्या सायबर गुन्हे शाखेचे अधिकार्यांचा समावेश आहे.
'पीटीआय'ने दिले वृत्तानुसार, पश्चिम बंगाल 'एसआयटी'ने मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणी ओडिशातील बनहारपाली पोलिस स्टेशनमध्ये १२ संशयित आरोपींची चौकशी सुरु केली आहे. हिंसाचारातील अनेक संशयित आरोपी ओडिशात लपून बसले असल्याचा संशय असून, एसटीएफची झारसुगुडा येथही शोध घेत आहे.