

नवी दिल्ली : भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांना वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुभेच्छा दिल्या. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत शुभेच्छा दिल्या.
डॉ. मुरली मनोहर जोशी यांचा रविवारी (दि.५) ९१ वा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने राजकीय वर्तुळासह विविध क्षेत्रातील लोकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदींनी डॉ. जोशी यांनी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान म्हणाले की, भाजपचे दिग्गज नेते डॉ. मुरली मनोहर जोशी पक्षाच्या करोडो कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांची विद्वत्ता, दीर्घकालीन अनुभव आणि राष्ट्रवादी विचार देशासाठी अत्यंत मोलाचे आहेत. वाढदिवसानिमित्त त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतो,' असेही पंतप्रधान म्हणाले.