

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टँडअप कॉमेडियन कुनाल कामराला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी तिसरी नोटीस पाठवली आहे. त्यांना ५ एप्रिल रोजी हजर राहून जबाब नोंदवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी दोन वेळा समन्स पाठवूनही ते चौकशीसाठी हजर झाले नव्हते. त्यामुळे मुंबई पोलिसांनी आता तिसऱ्यांदा नोटीस बजावली आहे. कुनाल कामरावर नक्की कोणत्या प्रकरणात चौकशी सुरू आहे, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, वारंवार समन्सकडे दुर्लक्ष केल्याने आता पोलिसांची भूमिका कठोर होण्याची शक्यता आहे.