Forbes billionaires list | मुकेश अंबानी देशात सर्वात श्रीमंत

‘फोर्ब्ज’कडून अब्जाधीशांची यादी जाहीर; अदानी दुसर्‍या क्रमांकावर
Forbes billionaires list
Forbes billionaires list | मुकेश अंबानी देशात सर्वात श्रीमंतPudhari File Photo
Published on
Updated on

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी 105 अब्ज डॉलर्सच्या निव्वळ संपत्तीसह पुन्हा एकदा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. फोर्ब्ज इंडियाने भारतातील श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे. 92 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह गौतम अदानी आणि कुटुंब दुसर्‍या स्थानी आहेत.

अदानी दुसर्‍या स्थानी (92 अब्ज डॉलर्स)

अंबानींनंतर पायाभूत सुविधा क्षेत्रातील उद्योजक गौतम अदानी आणि त्यांचे कुटुंब 92 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसर्‍या स्थानावर आहेत. अमेरिकेतील शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने केलेले आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत.

नवीन चेहरे

या यादीत अनेक नवीन चेहर्‍यांचा समावेश झाला आहे, ज्यात वारी एनर्जीजचे दोशी बंधू 37 व्या स्थानी (7.5 अब्ज डॉलर्स) आणि डिक्सन टेक्नॉलॉजीजचे सुनील वचानी 80 व्या स्थानी (3.85 अब्ज डॉलर्स) आहेत.

रुपयाच्या अवमूल्यनामुळे संपत्तीत 9 टक्के घट

भारतातील 100 सर्वात श्रीमंत लोकांच्या एकूण संपत्तीत 9 टक्के घट होऊन ती 1 ट्रिलियन डॉलर्सवर आली आहे. रुपयाचे अवमूल्यन आणि मागील मूल्यांकनापासून सेन्सेक्स शेअर निर्देशांकात झालेल्या 3 टक्के घसरणीमुळे घट झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news