

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्यप्रदेशच्या सिधी जिल्ह्यात सोमवारी (दि.10) भीषण अपघात घडला आहे. ट्रक आणि SUV यांच्यात झालेल्या धडकेत 7 जणांचा मृत्यू झाला असून 14 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर घटनास्थळी बचावकार्य सुरू असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिकृत सूत्रांकडून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे. अशी बातमी वृत्तसंस्था 'पीटीआय'ने दिली आहे.
या अपघाताबद्दल बोलताना सिधी जिल्ह्याच्या डीएसपी गायत्री तिवारी म्हणाल्या, "काल रात्री २ वाजताच्या सुमारास, आम्हाला उत्नी पेट्रोल पंपाजवळ एका बलकर आणि कारमध्ये झालेल्या अपघाताची माहिती मिळाली. सुमारे १४ जण जखमी झाले आहेत आणि किमान सात जणांचा मृत्यू झाला आहे. बलकर सिधीहून बहरीला जात होता. तपास सुरू आहे."