Political News: मोदी, शहा यांच्या रणनीतीने बदलला निवडणुकीचा मुद्दा; एसआयआरवरील काँग्रेसची आक्रमकता पडली मागे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रणनीतीने विरोधी एकजुटीसमोर नवे आव्हान उभे केले आहे.
Narendra Modi| amit shah
Narendra Modi| amit shahPudhari
Published on: 
Updated on: 

उमेश कुमार

नवी दिल्ली: 'क्या से क्या हो गया देखते-देखते...' प्रसिद्ध गझलमधील ही ओळ सध्या विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या राजकीय आव्हानांना तंतोतंत लागू पडताना दिसत आहे. मतदार यादीच्या विशेष सखोल पडताळणी (एसआयआर) मुद्द्यावर संसदेपासून रस्त्यापर्यंत विरोधकांना एकत्र आणण्यात यशस्वी ठरलेली काँग्रेस आता परिसीमन (मतदारसंघ पुनर्रचना) प्रश्नावर आपल्याच मित्रपक्षांच्या वेगळ्या भूमिकेमुळे घेरली जाताना दिसत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रणनीतीने विरोधी एकजुटीसमोर नवे आव्हान उभे केले आहे. ज्या 'इंडिया' आघाडीने एसआयआरच्या मुद्द्यावर सरकारला घेरण्यासाठी संयुक्त आघाडी उघडली होती, तिचे घटक पक्ष आता परिसीमन विधेयकावर एकमत होताना दिसत नाहीत.

Narendra Modi| amit shah
Delimitation Bill: परिसीमन विधेयकावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये शह-काटशह; काँग्रेसही हार मानण्यास तयार नाही

राहुल गांधी यांनी एसआयआरच्या मुद्द्यावरील विरोध शिखरावर नेला होता. संसदेपासून रस्त्यापर्यंत आंदोलनाचे नेतृत्व करून विरोधकांना एकत्र आणण्यात ते यशस्वी झाले होते. एसआयआरचा मुद्दा चांगलाच गाजू लागला होता. आगामी लोकसभा निवडणुकीत हाच प्रमुख मुद्दा बनेल असे वाटू लागले होते.

परंतु, परिसीमन बिलावर अडखळलेले सरकार आतूनच हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी पूर्ण ताकदीने कामाला लागले होते. राजकीय बुद्धिबळाचे डावपेच आखले जात होते. विरोधक एसआयआरवर अडकून राहिले आणि सत्ताधारी पक्ष आपले काम करण्यात मग्न राहिला. जेव्हा काम पूर्ण झाले, तेव्हा संसदेचे अधिवेशन बोलावण्याची घोषणा करण्यात आली. या घोषणेसोबतच 'इंडिया' आघाडीतील फूटही समोर आली.

Narendra Modi| amit shah
Deepa Malik Inspirational Story: दिव्यांगपणानेच मला जगण्याचे खरे ध्येय दिले; पद्मश्री डॉ. दीपा मलिक यांच्या भावना

सरकारने परिसीमन आणि महिला आरक्षण यांची सांगड घालून नवी राजकीय आघाडी उघडली. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर आणि ३० नोव्हेंबरपासून संसदेची विशेष बैठक बोलावल्यानंतर विरोधकांची रणनीती बदलताना दिसू लागली.

सरकारने लोकसभेच्या जागांमध्ये ५० टक्के वाढ आणि २०२९ च्या निवडणुकीपासून महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसेच, २०५१ पर्यंत राज्यांचा विद्यमान जागांचा वाटा कायम ठेवण्याची गोष्टही करण्यात आली आहे. या प्रस्तावाने विरोधी पक्षांसमोर नवी राजकीय आणि घटनात्मक कोंडी उभी केली आहे.

विखुरली 'इंडिया' आघाडी

एसआयआरवर एकवटलेली 'इंडिया' आघाडी परिसीमन दुरुस्ती विधेयकावर पूर्णपणे विखुरताना दिसत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (एनसीपी) विधेयकाला पाठिंबा देण्याची उघड घोषणा केली आहे. द्रमुक (डीएमके) आधीच काँग्रेसवर नाराज आहे. स्टॅलिन यांनी सूचक शब्दांत स्पष्ट केले आहे की, या विधेयकात ते सरकारसोबत राहतील.

झारखंड मुक्ती मोर्चानेही (झामुमो) म्हटले आहे की, आदिवासींच्या जागांवर जर कोणताही परिणाम झाला नाही, तर त्यांना या विधेयकावर कोणतीही हरकत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की झामुमो देखील विधेयकाच्या बाजूने उभी आहे. यानंतर 'इंडिया' आघाडीत काँग्रेससोबत केवळ ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्षच उभा असलेला दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.