

बंगळूर : काँग्रेस आमदार आणि ज्येष्ठ अभिनेते दोड्डण्णा यांचे जावई के. सी. वीरेंद्र उर्फ पप्पी यांनी बेकायदेशीर ऑनलाईन बेटिंगद्वारे अल्पावधीत दोन हजार कोटी रुपयांचा नफा कमावला आहे, असे अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) छाप्यात उघडकीस आले आहे.
कॅसिनोचा किंगपिन म्हणून के. सी. वीरेंद्र उर्फ पप्पी गोवा आणि श्रीलंकेसह विविध ठिकाणी कॅसिनो चालवत आहे. ईडी अधिकार्यांनी त्यांच्याशी संबंधित 31 ठिकाणी छापे टाकले. यामध्ये चल्लाकेरे, बंगळूर, पणजी, गंगटोक, जोधपूर, हुबळी आणि मुंबई येथे हजारो कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहार आढळले आहेत. आमदार वीरेंद्र यांच्या खर्या भांडवलाचा पाठलाग करणार्या ईडी अधिकार्यांना किंग 567, राजा 567, लायन 567 इत्यादी नावांच्या ऑनलाईन बेटिंग साइट्स सापडल्या आहेत. या तो बेकायदेशीरपणे चालवत होता. त्यांनी वेबसाइट्स राउटिंग आणि मनी ट्रान्सफरसाठी अनेक गेटवे देखील वापरले आहेत. अल्पावधीत दोन हजार कोटी रुपयांचा नफा कमावल्याचा दावा ईडीने केला आहे.