

Delhi Kalikaj Temple Minor Girls Assault: दिल्लीतील कालकाजी इस्कॉन मंदिर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर पोलीस असल्याचा सांगून बलात्कार करण्यात आला आहे. दिल्ली पोलीसांना रात्री ८.४५ वाजता एक पीसीआर कॉल आला होता. त्या कॉलवर एका १७ वर्षाच्या मुलीने तिच्या अल्पवयीन मैत्रिणीवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला. ही घटना दिल्लीतील कालकाजी मंदिर परिसरात झाल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपींपैकी एकाने दिल्ली पोलिसांवर गोळीबार केला आहे. त्याला पोलीस देखील प्रत्युत्तर दिला. दिल्ली पोलीस या प्रकरणाता तपास करत असून इतर आरोपींना देखील शोधण्याचा प्रयत्न चालू आहे.
पोलिसांना आला होता कॉल
१७ वर्षाच्या पीडित मुलीने सांगितलं की ती आणि तिची मैत्रीण रात्री ७ वाजता कालकाजी मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर त्या अष्ट कुंज पार्कमध्ये गेल्या होत्या. जवळपास ७.३० वाजता २५ ते ३० वर्षाचे तीन व्यक्ती आमच्या जवळ आल्या आणि त्यांनी आम्ही पोलीस खात्यातील आहोत असं सांगत आम्हाला धमकी देण्यास सुरूवात केली. त्यानंतर पीडित मुलीने सांगितलं की त्यातील एखा व्यक्तीने तिच्या मैत्रिणीला पकडलं अन् त्यानंतर त्या तिघा व्यक्तींनी तिच्यावर बलात्कार केला.