

Parents Held for Controversial Post
लखनौ : इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढविण्यासाठी हिंदू देवतांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी करणारी रील पोस्ट केल्या प्रकरणी एका अल्पवयीन मुलीला बालसुधार गृहात पाठवण्यात आले आहे. तर पोलिसांनी तिच्या पालकांना अटक केली आहे.
अल्पवयीन मुलीने एक मिनिटांचा व्हिडिओ २७ ऑक्टोबर रोजी इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता. यामध्ये मुलगी हिंदू देवतांविरोधात टिप्पणी करताना दिसली. ही पोस्ट मोठ्या प्रमाणवर व्हायरल झाली. हिंदू संघटनांनी मुलीसह तिच्या कुटुंबाविरुद्ध निदर्शने करत आणि त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.
हिंदू देवतांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी करणारी रील पोस्ट केल्या तक्रार दाखल झाली. पोलिसांनी मुलीला बाल सुधार गृहात पाठवले. तर मुलीने पोस्ट केलेल्या व्हिडिओची माहिती असल्याने पालकांना अटक केली. पालकांना मुलीचे कृत्य माहिती होते. इतर काही लोकही यात सामील होते. त्यांनी हा गुन्हा लपविण्याचा प्रयत्न केला, असेही पोलिसांनी स्पष्ट केले. या प्रकरणी आणखी एका फरार आरोपीचा शोध सुरु आहे. पुरूषाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीला सोशल मीडियावर प्रेक्षक आणि फॉलोअर्स वाढवायचे होते. आम्ही तिच्या पालकांना अटक केली आहे.व्हिडिओ शेअर करणाऱ्यांवर आम्ही कठोर कारवाई करू," असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
आई -वडिलांना अटक झाल्यानंतर मुलीने आपल्या कृत्याची कबुली देताना आणि माफी मागतानाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये मुलीने म्हटलं आहे की, "मी व्हिडिओ बनवून चूक केली. मी माफी मागते. मी पुन्हा कधीही अशी चूक करणार नाही. मी लोकांना व्हिडिओ व्हायरल करू नये अशी विनंती करते."