पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यात मागील वर्षभरात झालेल्या हिंसाचाराबद्दल मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी माफी मागून काही तास उलटण्याच्या आतच मणिपूरमध्ये नव्याने दहशतवादी हल्ला झाला आहे. इंफाळ पश्चिम कडंगबंद परिसरात संशयित दहशतवाद्यांनी गोळीबारानंतर बॉम्बफेकही केली.
आज (दि.१) पहाटे मणिपूरच्या इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील कडंगबंद भागात संशयित दहशतवाद्यांनी हल्ला केला. अत्याधुनिक शस्त्रांनी गोळीबार केला. पश्चिम जिल्ह्यातील सखल कादंगबंद भागात बॉम्बफेकही केली. दहशवाताद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर परिसरात तैनात ग्राम स्वयंसेवकांनी प्रत्युत्तर दिले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दल या भागात पाठवण्यात आले आहे. दरम्यान, मणिपूरमध्ये मे 2023 मध्ये हिंसाचार सुरू झाल्यापासून संशयित अतिरेक्यांनी कडंगबंद भागात अनेक हल्ले केले आहेत.
हिंसाचारात अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले. हजारो बेघर झाले. सर्व पीडितांची माफी मागतो.जे काही घडले ते घडून गेले आहे. भूतकाळातील चुका माफ करा. आता सारं काही विसरून राज्यातील सर्व जमातींसोबत सुसंवादाने राहूया. शांतता आणि समृद्धीने भरलेले नवीन जीवन सुरू करूया," अशा शब्दांमध्ये मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी मंगळवारी (दि.३१ डिसेंबर) राज्यातील माफी मागितली होती.