मेहबुबा मुफ्ती जम्मू-काश्मीरची निवडणूक लढवणार नाहीत!

पक्षाचा अजेंडा राबवता येणार नसल्‍याची स्‍पष्‍टोक्‍ती
Mehbooba Mufti
मेहबूबा मुफ्तीFile Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मी मुख्‍यमंत्री झाले तरी आमच्‍या पक्षाचा अजेंडा पूर्ण करु शकणार नाही, असे स्‍पष्‍ट करत जम्‍मू-काश्‍मीर विधानसभा निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा आज (दि. २८) पीडीपीच्‍या अध्‍यक्षा मेहबूबा मुफ्ती ( Mehbooba Mufti ) यांनी केली.

कट्टर प्रतिस्पर्धी नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश होईपर्यंत निवडणुकीत भाग न घेण्याच्या भूमिकेवर यू-टर्न घेतला आहे. याबाबत मेहबूबा मुफ्‍ती यांना निवडणूक लढवणार का याप्रश्‍नावर मेहबूबा मुफ्‍ती म्‍हणाल्‍या की, भाजपबरोबर युती असणार्‍या सरकारमध्‍ये मी मुख्‍यमंत्री होते. २०१६मध्‍ये मी १२ हजार लोकांविरोधात दाखल करण्‍यात आलेले गुन्‍हे रद्द केले होते. आता आपण ते करु शकतो का, मी मुख्‍यमंत्री म्‍हणून फुटीरतावाद्यांना पत्र लिहून चर्चेसाठी आमंत्रित करू शकणार आहे ?, असे स्‍पष्‍ट करत मी जम्‍मू-काश्‍मीर विधानसभा निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा त्‍यांनी केली.

आम्‍ही आमचा अजेंडा राबविण्‍याचा विचार करु शकतो का?

"आम्ही 2002 मध्ये काँग्रेससोबत युती केली तेव्हा आमचा एक अजेंडा होता. आम्ही सय्यद अली गिलानीला तुरुंगातून सोडले. तुम्ही आज ते करण्याचा विचार करू शकतो का? आम्ही 2014 मध्ये भाजप सरकारसोबत युती केली तेव्हा आमचा अजेंडा होता. कलम ३७० ला हात लावला जाणार नाही, AFSPA रद्द करणे, पाकिस्तान आणि हुर्रियतशी चर्चा करणे, वीज प्रकल्प परत करणे इ. आमच्याकडे एक अजेंडा होता, असेही त्‍यांनी सांगितले.

कलम 370 पुनर्संचयित करणे महत्त्वाचे

2002 मध्ये सरकारमध्‍ये असताना आम्‍ही 'पोटा' कायदा रद्द करण्‍याची आश्‍वासन पूर्ण केले. क्रॉस-एलओसी) मार्ग खुला केला. फुटीरवाद्‍यांची चर्चा सुलभ करू असे सांगत आम्ही हुर्रियत कॉन्फरन्ससोबत चर्चा केली. आम्ही आमच्या पक्षाचे धाेरण राबवले. आज जम्‍मू-काश्‍मीरमधील समस्येचे निराकरण करण्यासाठी कलम 370 पुनर्संचयित करणे देखील महत्त्वाचे आहे, असेही त्‍मेहबूबा मुफ्ती यांनी सांगितले.

नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस युती केवळ सत्तेसाठी

नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांच्यातील युतीबाबत बोलताना मुफ्‍ती म्‍हणाल्‍या की, दोन्‍ही पक्ष नेहमीच केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहेत. दरम्‍यान, दरम्‍यान, नॅशनल कॉन्‍फरन्‍सचे नेते ओमर अब्‍दुल्‍ला यांनीही विधानसभा निवडणूक लढविणार नसल्‍याचे जाहीर केले होते. मात्र त्‍यांनी यू टर्न घेत मंगळवारी गांदरबल मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्‍याची घोषणा केली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news