पुढारी ऑनलाईन डेस्क : वक्फ दुरुस्ती विधेयकाबाबत (Waqf Bill) ंयुक्त संसदीय समिती (जेपीसी) च्या बैठकीत गदारोळ झाला. यावेळी दोन खासदारांमध्ये जोरदार वादावादी झाली. यावेळी तृणमूल काँग्रेसचे खासदार खासदार कल्याण बॅनर्जी यांनी रागाच्या भरता बाटली फोडली. यामुळे त्यांच्या बोटाला दुखापत झाली आहे.
ANIने दिलेल्या वृत्तानुसार, वक्फ विधेयकावरील JPC (संयुक्त संसदीय समिती) ची बैठक संसदेच्या संलग्नीत सुरू झाली. घटनेच्या प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी तिथे ठेवलेली काचेची पाण्याची बाटली उचलत ती टेबलावर आपटली. या घटनेत त्यांना स्वत:लाच दुखापत झाली आहे.
खासदार कल्याण बॅनर्जी यांना वक्फवरील संसदीय समितीमधून एका दिवसासाठी निलंबित करण्यात आले असल्याचे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे.
केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी 8 ऑगस्ट रोजी २०२४ लोकसभेत वक्फ (सुधारणा) विधेयक, 2024 आणि मुस्लिम वक्फ (रद्द) विधेयक, 2024 सादर केले. 40 हून अधिक सुधारणांसह, वक्फ (सुधारणा) विधेयकात विद्यमान वक्फ कायद्यातील अनेक कलमे काढून टाकण्याचा प्रस्ताव आहे. हे विधेयक विद्यमान कायद्यात दूरगामी बदल सुचवते. त्याचबरोबर केंद्रीय आणि राज्य वक्फ बोर्डामध्ये मुस्लिम महिलांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करणे देखील समाविष्ट आहे. यासोबतच कोणत्याही धर्माचे लोक या समितीचे सदस्य होऊ शकतात. 2013 मध्ये या कायद्यात शेवटची दुरुस्ती करण्यात आली होती.
काँग्रेस आणि समाजवादी पक्षासह विरोधी पक्षांनी हे विधेयकाला मुस्लीमविरोधी म्हटले होते. विरोधकांच्या आक्षेप आणि प्रचंड विरोधादरम्यान हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे (जेपीसी) पाठवण्यात आले आहे. वक्फ विधेयकासंदर्भात स्थापन होणाऱ्या जेपीसीमधील सदस्य पुढील प्रमाणे : जगदंबिका पाल, निशिकांत दुबे, तेजस्वी सूर्या, अपराजिता सारंगी, संजय जयस्वाल, दिलीप सैकिया, अभिजीत गंगोपाध्याय, श्रीमती डीके अरोरा, गौरव गोगोई, इम्रान मसूद, मोहम्मद जावेद, मौलाना मोहिबुल्ला, कल्याण बॅनर्जी, ए. आर. राजा, एलएस देवरायुलु, दिनेश्वर कामत, अरविंत सावंत, सुरेश गोपीनाथ, नरेश म्हस्के, अरुण भारती आणि असदुद्दीन ओवेसी.