पुढारी ऑनलाईन डेस्कः मेरठ येथील मर्चंट नेव्हीतील अधिकारी सौरभ राजपूत यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाने उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पत्नी मुस्कान रस्तोगी व तिचा प्रियकर साहिल शुक्ला या दाेघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहे. दरम्यान, मुस्कान आणि साहिल हे दाेघेही ड्रग्ज ॲडिक्ट (अंमली पदार्थांच्या सेवन) असल्याची धक्कादायक माहिती पाेलीस चाैकशीत समाेर आली आहे. ( Saurabh Rajput murder case )
मुस्कानच्या आई-वडिलांनी आपला मुलीशी कोणताही संबध नाही, असे जाहीर केले आहे. तिला भेटायलाही नकार दिला आहे. तिच्या कुटुंबातून कोणीही तिला भेटायला येणार नाही. तिच्यासाठी कोणताही वकील देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.मुस्कानने आता तुरुंग प्रशासनाकडे सरकारी वकील देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे तिच्या मागणीप्रमाणे आता तुरुंग प्रशासनाने न्यायालयाला पत्र पाठवून सरकारी वकील देण्याची विनंती केली आहे.
या प्रकरणात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जेलमध्ये मुस्कानने आपला प्रियकर साहिल शुक्लाबरोबर राहण्याची विचित्र मागणी केली होती. तर तुरुंगाच्या नियमानुसार अशी परवानगी देता येत नाही. त्यामुळे ही मागणी फेटाळून लावण्यात आली.
मेरठमधील ब्रम्हपूरी भागातील इंदिरानगर येथील मर्चंट नेव्हीत काम करणारा सौरभ राजपूत हा आपल्या पत्नीसोबत व पाच वर्षाच्या मुलीसोबत राहत होता. त्याची पोस्टिंग लंडनमध्ये होती. तो ४ मार्च रोजी सुट्टीवर घरी आला. त्याच रात्री त्याची हत्या करण्यात आली. पत्नी मुस्कान हिचे साहिल शुक्ला या तरुणाशी प्रेमसंबध होते. या दोघांनी सौरभच्या हत्येचा कट रचला. त्यांनी सौरभववर चाकूने सपासप वार केले. त्यानंतर त्याच्या शरीराचे तुकडे करुन एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये भरले. त्यावर सिंमेट व पाणी ओतले. खून उघडकीस येऊ नये व दुर्गंधी येवू नये, म्हणून त्यांनी हा प्लॅन केला होता.
यानंतर त्यांनी घराला बाहेरुन कुलूप लावले व पतीसोबत बाहेर फिरायला गेल्याचा बनाव मुस्कानने केला. पण तिने ही गोष्ट आपल्या आईला सांगितली. आईने या गुन्ह्याची माहिती पाेलीसांना दिली. त्यानंतर हा धक्कादायक उघडकीस आला. पोलिसांनी ड्रम कापून साैरभचा मृतदेह बाहेर काढला हाेता.
साैरभ आणि मुस्कान या दाेघांनी कुुटुंबीयांचा विरोध पत्करुन 2016 मध्ये लव्ह मॅरेज केले होते. त्यांना ५ वर्षाची एक मुलगी आहे. सौरभ व मुस्कान यांच्यामध्ये हळूहळू दुरावा निर्माण झाला. मुस्कानचे साहिलशी प्रेमसंबध जुळले. सौरभ लंडनमध्ये काम करत होता व इकडे मुस्काने प्रेमसंबध सुरु होते. दोघांना सौरभचा काटा काढण्याचा कट रचला. .सौरभची हत्या करुन त्याचा मृतदेह ड्रममध्ये भरला. त्यानंतर हे दोघेही हिमाचल प्रदेशात फिरण्यासाठी गेले. मुस्कानने शेजार्यांना सांगितले होते की. ती पतीबरोबर फिरायला जाते.
मुस्कान व साहिलने अत्यंत निर्घृणपणे सौरभचा खून केल्याचे समोर आले आहे. यामध्ये त्यांनी त्याच्या छातीत चाकू खूपसला. यानंतर त्याच्या शरीरावर वार केले. मृतदेहही अगदी क्रूरतेने कापला होता. सौरभचे मुंडके शरीरापासून वेगळे केले. त्यानंतर त्याचे दोन्ही हात कापून मृतदेह ड्रममध्ये भरला हाेता.
या प्रकरणातील दोन्ही आरोपी मुस्कान आणि साहिल हे पूर्णपणे अंमली पदार्थाच्या (ड्रग्ज) आहारी गेले होते. जिल्हा वैद्यकीय अधीक्षक डॉ. विरेश कुमार यांच्या मते जेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक कैद्याची तपासणी केली जाते. त्याचप्रमाणे मुस्कान व साहिल यांची तपासणी केल्यावर ते पूर्णतः नशेच्या आहारी गेल्याचे लक्षात आले. त्यांच्यावर उपचार सुरु केले असून नशा मुक्तीसाठी औषधे सुरु केली आहेत.