बांगलादेशात हिंदू नेत्याची निर्घृण हत्या; भारताने कडक शब्‍दांमध्‍ये सुनावले, "सबबी देणे थांबवा.."

अल्पसंख्याकांचे संरक्षण अंतरिम सरकारची जबाबदारी
killing of Hindu leader in Bangladesh
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जैस्वाल.Pudhari
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बांगलादेशमध्ये एका हिंदू नेत्याचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली, ज्यामुळे भारतात तीव्र संताप व्यक्त होत आहे. अल्पसंख्याकांना सुरक्षिततेची हमी देण्‍यासाठी भारत सरकारने मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारला कडक सूचना दिल्या आहेत. ( killing of Hindu leader in Bangladesh)

अपहरण व क्रूर हत्येने आम्‍ही व्यथित

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी सोशल मीडिया एक्सवर लिहिले, “आम्ही बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याक नेते श्री भाबेश चंद्र रॉय यांच्या अपहरण व क्रूर हत्येने व्यथित आहोत. ही घटना बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांविरोधातील सुरू असलेल्या अत्याचारांच्या मालिकेतील एक भाग वाटते. अशाच प्रकारे यापूर्वीही घडलेल्‍या घटनांमधील गुन्हेगार अजूनही खुलेआम फिरत आहेत.”

अल्पसंख्याकांचे संरक्षण ही अंतरिम सरकारची जबाबदारी

जैस्वाल आपल्या ट्वीटमध्ये लिहितात, “आम्ही निर्घृण हत्‍येचा निषेध करतो. बांगलादेशच्या अंतरिम सरकारला पुन्हा एकदा आठवण करुन देतो की, कोणताही भेदभाव किंवा सबब देणे थांबवावे. बांगलादेशमधील हिंदूंसह सर्व अल्पसंख्याकांचे संरक्षण करणे ही त्यांची जबाबदारी आहे.”

अपहरण करून निर्घृण हत्या

बांगलादेशमधील दैनिक 'द डेली स्टार'ने दिलेल्‍यिा वृत्तात म्‍हटलं आहे की, ढाक्यापासून सुमारे 330 किलोमीटर उत्तर-पश्चिमेकडील दिनाजपूरच्या बसुदेबपूर गावचे रहिवासी असलेल्या भाबेश चंद्र रॉय (वय 58) यांचा मृतदेह गुरुवारी रात्री आढळून आला. रॉय यांच्या पत्नी शांतना यांना संध्याकाळी साडेचारच्या सुमारास त्यांना एक फोन आला होता. यानंतर सुमारे 30 मिनिटांनंतर दोन दुचाकींवर चार जण आले आणि त्यांनी भाबेश यांना घराच्या परिसरातून जबरदस्तीने अपहरण केलं. त्यांना नाराबारी गावात नेलं गेलं, जिथे त्यांच्यावर अमानुष मारहाण करण्यात आली. रॉय हे बांगलादेश पूजा उत्सव परिषदच्या बिराल विभागाचे उपाध्यक्ष होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news