मनू भाकरने घेतली राहुल गांधींची भेटPudhari Photo
राष्ट्रीय
पॅरिस ऑलिंपिकमधील कांस्य पदक विजेती नेमबाज मनू भाकर राहुल गांधींच्या भेटीला
संसदेत घेतली विरोधी पक्षनेते गांधी यांची भेट
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा- पॅरिस ऑलिंपिकमधील कांस्य पदक विजेती नेमबाज मनू भाकरने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींची संसदेत भेट घेतली. राहुल गांधींनी मनू भाकरला मिठाई भरवत तिचे अभिनंदन केले. यावेळी मनू भाकरचे पालक आणि प्रशिक्षक जसपाल राणा उपस्थित होते.
याआधी, बुधवारी भाकर यांनी काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर मनूने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचीही भेट घेतली होती. याबरोबरच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची सुद्धा तिने भेट घेतली होती.

.jpeg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)