नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया जामीनावर तुरुंगाबाहेर आहेत. आता त्यांनी जामिनाच्या अटी शिथिल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) नोटीस बजावली आहे.
न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने पुढील सुनावणीच्या वेळी या प्रकरणावर स्थगिती न ठेवता निर्णय घेणार असल्याचे सांगितले. या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या दोन्ही संस्थांनी नोंदवलेल्या खटल्यांमध्ये न्यायालयाने या वर्षी ऑगस्टमध्ये सिसोदिया यांना जामीन मंजूर केला होता.