पुढारी ऑनलाईन डेस्क : " हिंसाचारात अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले. हजारो बेघर झाले. सर्व पीडितांची माफी मागतो.जे काही घडले ते घडून गेले आहे. भूतकाळातील चुका माफ करा. आता सारं काही विसरून राज्यातील सर्व जमातींसोबत सुसंवादाने राहूया. शांतता आणि समृद्धीने भरलेले नवीन जीवन सुरू करूया," अशा शब्दांमध्ये मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी राज्यातील हिंसाचाराबद्दल माफी मागितली.
एका कार्यक्रमात बोलताना बिरेन सिंह म्हणाले की, हे वर्ष अत्यंत दुर्दैवी होते. राज्यात झालेल्या हिंसाचारात ज्यांनी आपला जीव गमावला आणि जे विस्थापित झाले अशा कुटुंबियांप्रती मला खेद वाटतो. जे घडत आहे त्याबद्दल मला मणिपूरच्या लोकांची माफी मागयची आहे. हिंसाचारात अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले. हजारो बेघर झाले. सर्व पीडितांची माफी मागतो," सिंह म्हणाले.
मे 2023 मध्ये जातीय संघर्ष सुरू झाल्यापासून गेल्या 20 महिन्यांत राज्यात मणिपूरमध्ये गोळीबाराच्या घटनांमध्ये घट झाली आहे. तसेच मागील तीन ते चार महिन्यांत शांततेच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. की येत्या वर्षभरात राज्यात सामान्यता आणि शांतता पूर्ववत होईल, असा विश्वासही सिंह यांनी व्यक्त केला. जे काही घडले ते घडले. आपण भूतकाळातील चुका माफ करू आणि विसरून जाऊ आणि मणिपूर सर्व मान्यताप्राप्त 34-35 जमातींसोबत सुसंवादाने राहून शांतता आणि समृद्धीने भरलेले नवीन जीवन सुरू करूया, असे आवाहनही त्यांनी केले. मुख्यमंत्र्यांनी केेलेल्या आवाहनाचे अनेकांनी स्वागत केले आहे.