ना मेडल, ना ट्रॉफी! देवरियात 'मॅन ऑफ द मॅच'ला मिळाला चक्क जिवंत देशी कोंबडा

ना मेडल, ना ट्रॉफी! देवरियात 'मॅन ऑफ द मॅच'ला मिळाला चक्क जिवंत देशी कोंबडा
Published on
Updated on

देवरिया : क्रिकेट स्पर्धा म्हटले की ट्रॉफी, मेडल किंवा रोख बक्षीस असे गणित ठरलेले असते; मात्र उत्तर प्रदेशातील देवरिया येथे झालेल्या एका स्थानिक क्रिकेट स्पर्धेने बक्षीस देण्याची परंपराच बदलून टाकली. तेथे ‘सामनावीर’ ठरलेल्या खेळाडूला रोख रक्कम किंवा ट्रॉफीऐवजी देशी कोंबडा बक्षीस म्हणून देण्यात आला.

या स्थानिक क्रिकेट स्पर्धेत अनेक संघांनी सहभाग घेतला. सामने पूर्ण जोश आणि उत्साहात पार पडले. जेव्हा पारितोषिक वितरणाचा क्षण आला, तेव्हा प्रेक्षकांना वाटले की, आता ट्रॉफी किंवा रोख बक्षीस दिले जाईल; पण ‘मॅन ऑफ दि मॅच’ची घोषणा होताच मंचावर एक तगडा देशी कोंबडा आणण्यात आला आणि तोच खेळाडूला बक्षीस म्हणून देण्यात आला. हे द़ृश्य पाहताच मैदानात हशा, टाळ्या आणि आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले. कोंबडाही अगदी ताजातवाना आणि चपळ दिसत होता. खेळाडू स्वतःही हसत होता आणि प्रेक्षकांनी हा क्षण मोबाईलमध्ये कैद केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news