

पुढारी ऑनलाईन डेस्कः
बिहारमधील पुर्णिया जिल्ह्याचे खासदार पप्पु यादव यांना लॉलेन्स बिष्णोई गँगने जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्या संबधी एका आरोपीला दिल्ली येथून अटक केली आहे. त्याची चौकशी केली असता या प्रकरणात बिष्णोई गँगचा संबध नसल्याचे समोर आले आहे. आरोपीकडून मोबाईल व सिमकार्ड जप्त केले आहे. त्याने लॉरेन्स बिष्णोई गँगचा सदस्य असल्याचे सांगून खासदार पप्पू यादव यांना धमकी दिली होती.
यासंबधी अधिक माहिती अशी की पप्पू यादव यांनी सलमान खानला बिष्णोई टोळीने धमकी दिल्याप्रकरणी व सलमान खानचे मित्र असलेले बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणावर भाष्य केले होते. यानंतर यादव यांना धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले होते. यादव यांनी स्वतः व्हिडीओ प्रसारित करुन ही माहिती दिली होती. त्यांनी बिहार पोलिसांकडे अधिक सुरक्षेची मागणी केली होती.
आता अटक केलेल्या आरोपीचे नाव महेश पांडे असून ताे दिल्ली सेक्टर ४ मध्ये राहणारा आहे. त्याने युएईत सिमकार्ड घेतले होते. त्याची तिथे राहणारी मेव्हणी हिच्या नाव हे सिम कार्ड खरेदी केले होते. भारतात आल्यावर त्याने त्या सिमकार्डचा वापर सुरु केला. व्हाॅटसॲपही याच नंबरवर सुरु केले.
या दरम्यान पप्पू यादव यांनी सलमान खान व बाबा सिद्दीकी यांसंदर्भात केलेली वक्तव्य माध्यमांमधून प्रसारित होत होती. याचा फायदा घ्यायचा आरोपीने ठरवले. व खासदार पप्पू यादव यांचा नंबर गुगलवरुन शोधून काढला व त्यांना मेसेज केला. व नंतर त्यांना कॉल करुन आपण बिष्णोई गँगचे सदस्य असून त्यांना धमकी दिली होती. प्रत्यक्षात त्याचा व बिष्णोई गँगचा काहीही संबध नसल्याचे प्रथमदर्शनी तपासात आढळून आले आहे.