अमृतसरमधील मंदिराबाहेर ग्रेनेड हल्ला प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार

Punjab Encounter: पोलीस कर्मचारी जखमी, आरोपीचा साथीदार पसार
 Punjab Encounter
प्रातिनिधिक छायाचित्र.File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अमृतसर मंदिराबाहेर झालेल्या ग्रेनेड हल्ला प्रकरणातील आरोपी पोलिस चकमकीत ठार झाला आहे. आरोपीचा दुसरा साथीदार विशाल कुमार उर्फ ​​चुई हा घटनास्थळावरून पळून गेला. या चकमकीत पोलिस कॉन्स्टेबल गुरप्रीत सिंग जखमी झाले असून, त्‍यांना रुग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे. ( Punjab Encounter)

अमृतसरमध्‍ये गुरुवारी (दि. १३ मार्च ) रात्री उशिरा दुचाकीस्वारांनी मंदिराबाहेर ग्रेनेडचा स्फोट केला होता. यामध्‍ये गुरसिद्धक सिंग उर्फ ​​सिद्दीकी यांचा मृत्‍यू झालाहोता. हल्ल्यातील दोन्ही आरोपी राजासांसी परिसरात फिरत असल्याची माहिती सीआयए कर्मचाऱ्यांना मिळाली होती. याअंतर्गत, सीआयए कर्मचारी आणि पोलिस ठाण्याने संयुक्त कारवाई केली.

आराेपीचा पाेलिसांवर गाेळीबार

आरोपी राजासांसी परिसरात दुचाकीवरून जात होते. पोलिसांनी रचलेला सापळा पाहून आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. पाेलिसांनीही प्रत्युत्तर म्हणून गोळ्या झाडल्या. एका आरोपीला गोळी लागल्याने जखमी झाला. आरोपींनी झाडलेल्या गोळ्यांमध्ये कॉन्स्टेबल गुरप्रीत सिंग देखील जखमी झाले. तर आराेपीचा साथीदार विशाल घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी आरोपी आणि कॉन्स्टेबलला तत्‍काळ रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी आरोपी सिद्दीकीला मृत घोषित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news