

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'माझी मालमत्ता घेण्याचा कोणालाही अधिकार नाही, तर मी दुसऱ्याची मालमत्ता घेतली जाईल असे कसे म्हणू शकते?' आपल्याला ३० टक्के सोबत घेऊन जावे लागेल. लक्षात ठेवा दीदी तुमच्या मालमत्तेचे रक्षण करेल," अशा शब्दांमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मुस्लिम समुदायाच्या मालमत्तेचे रक्षण करण्याची घोषणा केली. विश्व नवकार महामंत्र दिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेष म्हणजे पश्चिम बंगालमध्ये वक्फ कायद्यावरून (Waqf Act) हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. यानंतर त्यांनी हे विधान केले आहे.
यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या की, 'माझ्यावर गोळ्या झाडल्या तरी तुम्ही मला एकतेपासून वेगळे करू शकणार नाही. पश्चिम बंगालमध्ये कोणतेही विभाजन होणार नाही. माझी मालमत्ता घेण्याचा कोणालाही अधिकार नाही, तर मी दुसऱ्याची मालमत्ता घेतली जाईल, असे कसे म्हणू शकते?'. आपल्याला ३० टक्के जनतेला सोबत घेऊन जावे लागेल. लक्षात ठेवा, दीदी तुमच्या मालमत्तेचे रक्षण करेल. काही लोक विचारतात की मी सर्व धर्मांच्या ठिकाणी का जाते. मी म्हणतो की मी आयुष्यभर तिथेच जात राहीन, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
वक्फ कायदा ८ एप्रिलपासून लागू झाला आहे. या कायद्यावरून पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरू आहे. पश्चिम बंगालमधील मुस्लिमबहुल मुर्शिदाबाद जिल्ह्यात मंगळवारी वक्फ (दुरुस्ती) कायद्याच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. जंगीपूर परिसरातील राष्ट्रीय महामार्ग १२ मंगळवारी (दि. ८) दुपारी मोठ्या संख्येने जमाव रस्त्यावर उतरला. वक्फ कायदा मागे घेण्याची मागणी करत निदर्शने करण्यात आली. यावेळी जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. तसेच अनेक वाहनांची जाळपोळही केली. आज या परिसरात शांततापूर्ण परिस्थिती आहे. रघुनाथगंज आणि सुती पोलिस स्टेशन परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याचे पोलीसांनी स्पष्ट केले आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील सर्व संवेदनशील भागात, विशेषतः जंगीपूर शहर आणि आसपास मोठ्या प्रमाणात पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. कोणत्याही चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी जांगीपूर भागात इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत.