पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील १२ शहरात औद्योगिक पार्क उभारण्यास केंद्र सरकारने बुधवारी (दि.२८) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली. या 12 औद्योगिक पार्कसाठी २८ हजार ६०२ कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. तर सुमारे १० लाख रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे.त्याचबरोबर ३ नवीन रेल्वे प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. (Union Cabinet Decisions)
मंत्रिमंडळ बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मंत्रिमंडळाने देशातील १२ शहरात औद्योगिक पार्कला मंजुरी दिली आहे. यापैकी १२ शहरांची नावे आज जाहीर करण्यात आली आहेत, तर १ पार्क हरियाणा राज्यात उभारण्यात येणार आहे. हरियाणात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे त्याचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. २८ हजार कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे १० लाख रोजगार निर्माण होतील आणि १.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे.
खुरपिया, उत्तराखंड
राजपुरा पटियाला, पंजाब
आग्रा, उत्तर प्रदेश
प्रयागराज, उत्तर प्रदेश
गया, बिहार
दिघी बंदर, महाराष्ट्र
जोधपूर पाली मारवाड, राजस्थान
कोपर्थी, आंध्र प्रदेश
ओरवकल, आंध्र प्रदेश
झहीराबाद, तेलंगणा
पलक्कड, केरळ