महाराष्ट्रातील २ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर; राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान

National Teacher Award | सागर बागडे, मंतैय्या बेडके यांचा ५ सप्टेंबरला गौरव
National Teacher Award to Sagar Bagde and Mantaiya Bedke
कोल्हापुूरचे सागर बागडे आणि गडचिरोलीचे मंतैय्या बेडके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. Pudhari News Network
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात माहिती आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त या पुरस्कारांचे वितरण केले जाईल. देशातील ५० शिक्षकांची निवड या पुरस्कारासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने केली आहे. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२४ साठी निवडलेल्या ५० शिक्षकांमध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या एस.एम. लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील चित्रकला शिक्षक सागर बागडे आणि गडचिरोली जिल्ह्यातील जाजावंडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक मंतैय्या बेडके यांचा समावेश आहे. (National Teacher Award)

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या शिक्षकांना नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित समारंभात पुरस्कार प्रदान करतील. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारात प्रशस्ती पत्र, ५० हजार रोख बक्षीस रक्कम आणि एक रौप्यपदक समाविष्ट आहे. (National Teacher Award)

सागर बागडे गेल्या ३० वर्षांपासून कोल्हापूरच्या एस.एम. लोहिया हायस्कूलमध्ये चित्रकला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना त्यांना मिळालेला हा राष्ट्रीय पुरस्कार त्यांच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाचा गौरव आहे. त्यांनी विद्यार्थ्यांसोबत देश-विदेशात कार्यक्रम करून दोन विश्वविक्रमही नोंदवले आहेत.

मंतैय्या बेडके यांनी गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागात उत्कृष्ट कार्य करत शाळेची पटसंख्या ८ वरून १३८ पर्यंत वाढवली आहे. त्यांनी लोकसहभागातून शाळेत स्मार्ट टीव्ही आणि इन्व्हर्टरसारख्या सुविधा उभारल्या आहेत. त्यांच्या अथक मेहनतीने आणि समर्पणाने गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आदर्श निर्माण केला आहे. (National Teacher Award)

National Teacher Award to Sagar Bagde and Mantaiya Bedke
कोल्हापूर : केशवराव भोसले नाट्यगृह आग प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news