Maharashtra Saree Exhibition Delhi | राजधानीतील महाराष्ट्र साडी प्रदर्शनाचा दिमाखदार सोहळ्याने समारोप; मुख्यमंत्र्यांकडून उपक्रमाची प्रशंसा

प्रदर्शनाला दिल्ली व परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद
Maharashtra Saree Exhibition
Maharashtra Saree ExhibitionPudhari
Published on
Updated on

Maharashtrian Culture in Delhi

नवी दिल्ली : गुढीपाडव्या निमित्ताने नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय महाराष्ट्र साडी प्रदर्शनाचा समारोप झाला. राज्याच्या समृद्ध हातमाग परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या या प्रदर्शनाला दिल्ली व परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाच्या समारोपाला केंद्रीय युवक व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती होती. 

चार दिवस चाललेले या उपक्रमाची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष दखल घेत शुभेच्छा संदेशाद्वारे आयोजकांचे अभिनंदन केले. राज्यातील पारंपरिक हातमाग उद्योगाला नवी संजीवनी देण्यासाठी आणि विणकरांना राष्ट्रीय स्तरावर हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी हे प्रदर्शन मैलाचा दगड ठरेल, असे प्रशंसोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.

Maharashtra Saree Exhibition
Sahitya Sammelan Delhi | नवी दिल्ली येथे महिला शासकीय अधिकाऱ्यांचे साहित्य संमेलन: संमेलनाध्यक्षपदी लीना मेहेंदळे यांची निवड

समारोपप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रदर्शनाला भेट देऊन विणकरांशी संवाद साधला. राज्याची संस्कृती आणि पैठणीसारख्या पारंपारिक कलेला जागतिक स्तरावर पोहचविणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे यावेळी त्या म्हणाल्या. तर या प्रदर्शनाच्या आयोजक महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला म्हणाल्या की, "विणकर आणि कारागिरांना कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकांशी जोडणे हा आमचा मुख्य उद्देश होता, जो या प्रदर्शनाद्वारे यशस्वीपणे साध्य झाला आहे." 

या प्रसंगी कार्यक्रमाला रक्षा खडसे, आर. विमला यांच्यासह महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, महाराष्ट्र सदनाचे सहाय्यक निवासी आयुक्त नितीन शेंडे आणि स्मिता शेलार, व्यवस्थापक प्रमोद कोलपते, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, सहाय्यक लेखाधिकारी निलेश केदारे यांची उपस्थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news