महिला नागा साध्वी कशा बनतात? जाणून घ्‍या त्‍यांच्या आयुष्‍याशी संबंधित रहस्‍ये

Maha Kumbh Mela 2025 : नागा साध्वी बनण्याची प्रक्रिया असते कठीण
mahakumbh mysterious life of naga sadhvi or mahila naga sadhu and who are female naga sadhus and how do they become and what difficult tests do they have to go through to become sadhvis
महिला नागा साध्वी कशा बनतात? जाणून घ्‍या त्‍यांच्या आयुष्‍याशी संबंधित रहस्‍येFile Photo
Published on
Updated on

प्रयागराज : पुढारी ऑनलाईन

प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाव्यात देशाच्या कानाकोपऱ्यासह जगभरातून भाविक येत आहेत. प्रयागराजमध्ये पवित्र नद्यांच्या संगमात स्‍नान करून पुण्य मिळवण्यासाठी दररोज या ठिकाणी लाखोंच्या संख्येने लोक हजेरी लावत आहेत. दरम्‍यान यावेळी महाकुंभात नागा पुरूषांसोबत महिलांचेही दीक्षा संस्‍कार होत आहेत. आपण पुरूष नागा साधुंबद्दल खूप ऐकले असेल, मात्र महिला नागा साधूंच्या विषयी कमीच ऐकायला मिळते. तर चला जाणून घेवू महिला साधु कोण असतात आणि कशा बनतात. त्‍यांना साध्वी बनण्यासाठी कोणत्‍या कठिण परिक्षांमधून जावे लागते.

प्रयागराजमध्ये महाकुंभाची सुरूवात झाली आहे. ज्‍या प्रकारे नागा साधू आकर्षणाचे केंद्र बनले आहेत, त्‍याच प्रकारे यावेळी महिला नागा साध्वी देखील आकर्षणाचे केंद्र बनल्‍या आहेत. यावेळी पुरूषांसोबतच महिलांची देखील दीक्षा संस्‍कार होत आहेत. लेखक धनंजय चोपडा यांच्या 'भारत मे कुंभ' या पुस्‍तकात महिला नागा साधू कोण होते. ती कशी बनते आणि त्‍यांना साध्वी बनण्यासाठी कोण कोणत्‍या कठीण परिक्षांमधून जावे लागते ते पाहुयात.

महिला नागा साधू कोण आहेत?

महिला नागा साधु 'नागिन', 'अवधूतनी', 'माई' म्‍हणून ओळखली जाते. त्‍या वस्‍त्रधारी असतात. सर्वाधिक 'माई' या जूना आखाड्यात आहेत. तेथे त्‍यांची संख्या हजारांच्या घरात आहेत. अन्य आखाड्यामध्येही महिला साधू आहेत, मात्र त्‍यांची संख्या कमी आहे. जूना अखाड्याने २०१३ रोजी माई बाडाला दशनामी संन्याशांच्या आखाड्याच्या स्‍वरूपात प्रदान केले. त्‍यांचे शिबिर जूना आखाड्याच्या ठिक जवळ लावले जाते. 'माई' किंवा 'अवधूतनिया' यांना आखाड्यांमध्ये 'श्रीमहंत' पद दिले जाते.'श्रीमहंत' पदासाठी निवडलेली महिला साधु शाही स्‍नानाच्या दिवशी पालकीमधून जाते. त्‍यांना आखाड्याचा ध्वज, डंका लावण्याची अनुमती असते.

महिला नागा साधू कसे बनतात

महिलांची नागा संन्यासी बनण्याची प्रक्रियाही कठीन असते. प्रयागराज कुंभाच्या दरम्‍यान माई बाडातील एका संन्यासीने सांगितले की, नागा संन्यासी बनण्याचा निर्णय घेणार्‍या महिलेच्या घर-कुटुंब आणि संसारिक जीवनाची सखोल माहिती घेतली जाते. संबंधित महिलेला हे प्रमाणित करणे आवश्यक असते की, तीच्या आयुष्‍यात आता कोणत्‍याही मोह मायेसाठी स्‍थान नाही. तीने आता ब्रह्मचर्येचे पालन करण्याचा संकल्‍प केला आहे. हे सिद्ध करण्यासाठी दहा ते बारा वर्षांचा कालावधी लागू शकतो. जेंव्हा आखाड्यांच्या गुरूंना या सर्व गोष्‍टींवर विश्वास बसतो, तेंव्हाच ते दीक्षा देण्यासाठी तयार होतात. दीक्षा प्राप्त केल्‍यानंतर महिला संन्सासीला संसारिक वस्‍त्र त्‍याग करावे लागतात. आखाड्याकडून मिळणारे पिवळे वस्‍त्रच संन्यासींप्रमाणे आपले शरीर झाकण्यासाठी वापरावे लागतात.

यानंतर मुंडन, पिंडदान आणि नदी स्‍नान असे विधी होतात. या पाच संस्‍कारामध्ये त्‍यांना गुरूकडून पहिल्‍यांदा राख, वस्‍त्र आणि कंठी प्रदान करण्यात येते. पिंडदानानंतर त्‍यांना दंड-कमंडल प्रदान केली जाते. यानंतर महिला नागा संन्यासिन पूर्ण दिवसभर जप करते. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर शिवशंकराचा जप आणि त्‍यानंतर आखाड्याच्या इष्‍ट देवतेची पूजा करतात. यानंतर आखाड्यामध्ये त्‍यांना संन्यासिनचा समजले जाते. 'मातेची' पदीवी देवून तीचा सन्मान केला जातो.

नागा साध्वी बनण्याची प्रक्रिया कठीण आहे

नागा संन्यासिन ही एकच वस्‍त्र लपेटून राहतात. नदी स्‍नान किंवा शाही स्‍नानावेळीही त्‍या वस्‍त्र लपेटूनच करतात. महिला नागा संन्यासिंनाही अवधूतनीची दीक्षा देण्याआधी पहिल्‍यांदा तीन वेळा विचारले जाते. काय त्‍यांना संसारिक जीवनात परतायचे असेल तर त्‍यांनी जावे. हे एका मनोवैज्ञानिक पक्रियेतून केले जाते. कारण संन्यास जीवन पत्‍करणाऱ्याला पुढे कोणताही पश्चाताप, भ्रम किंवा संकोच राहु नये. ते दृढतेने आपल्‍या नव्या जीवनाचे पालन करत रहावेत.

नागा साध्वीचे जीवन कसे असते

महिलांसाठी नागा साधू बनण्याचा मार्ग हा खूप खडतर असतो. यामध्ये १० ते १५ वर्षापर्यंत कठोर ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे लागते. गुरूंना आपली योग्‍यता आणि ईश्वरा प्रती समर्पणाचे प्रमाण द्यावे लागते. महिला नागा साधूंना जीवंत असतानाच पिंडदान आणि मुंडन करावे लागते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news