महाकुंभात मिळणारे 'हे' संकेत ठरतात भाग्‍यकारक; जाणून घ्‍या भाविकांची श्रद्धा

Maha Kumbh Mela 2025 : महाकुंभात प्रयागराजचे आहे वेगळे महत्‍व
mahakumbh 2025 These signs found during Mahakumbh prove to be auspicious
महाकुंभात मिळणारे 'हे' संकेत ठरतात भाग्‍यकारक; जाणून घ्‍या भाविकांची श्रद्धाFile Photo
Published on
Updated on

प्रयागराज : पुढारी वृत्तसेवा

१२ वर्षानंतर महाकुंभ संगम नगरीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. पहिले अमृत स्‍नान पार पडले आहे. दुसरे अमृत स्‍नान आता होणार आहे. अशावेळी लोकांची अशीही श्रद्धा आहे की, या महाकुंभामध्ये दैवी शक्‍ती या सामील होत असतात. (Maha Kumbh Mela 2025)

प्रयागराजमध्ये महाकुंभाचे पर्व सुरू आहे. देश-विदेशातून लाखो भाविक नद्यांच्या पवित्र संगमात आस्‍थेची डुबकी मारण्यासाठी महाकुंभात येत आहेत. साधु, संत आणि तपस्‍वीही महाकुंभात मोठ्‍या उत्‍साहात सहभागी होउन सर्वसामान्यांना मार्गदर्शन करत आहेत. साधू-संत आपापल्‍या शिबिरांमध्ये यज्ञ, जप, तप, कथा वाचन यामध्ये मग्‍न असल्याचे चित्र आहे. २९ जानेवारी रोजी दुसरे अमृत स्‍नान पार पडणार आहे. प्रयागराज प्रशासनाच्या माहितीनुसार, या अमृत स्‍नानामध्ये किमान ८ कोटी लोक सामिल होण्याचा अंदाज आहे. या अमृत स्‍नानाचा पहिला हक्‍क हा नागा साधुंना देण्यात आला आहे.

प्रयागराजचे आहे वेगळे महत्‍व

१२ वर्षानंतर महाकुंभ येतो. भक्‍तांमध्ये अशी श्रद्धा आहे की, महाकुंभात दैवी शक्‍तींचा वास असतो. कुंभ हा देशात फक्‍त चार ठिकाणी आणि ५ नद्‍यांच्या किणाऱ्यावर लागतो. ज्‍यामध्ये उज्‍जेन, हरिव्दार, नाशिक आणि प्रयागराजचा समावेश आहे. उज्‍जेनमध्ये क्षिप्रा नदी, नाशिकमध्ये गोदावरी, हरिव्दार मध्ये गंगा आणि प्रयागराजमध्ये यमुना आणि अदृश्य सरस्‍वतीचा संगम आहे. त्‍यामुळेच प्रयागच्या महाकुंभाला अधिक महत्‍व आहे.

कुंभात दैवी शक्‍तींचा वावर

हिंदू धर्म ग्रंथांनुसार, महाकुंभ ज्‍या ठिकाणी आयोजित केला जातो, त्‍या ठिकाणाला खूप पवित्र मानले जाते. या पवित्र भूमीवर फक्‍त पाय ठेवल्‍याने मनुष्‍याचे पाप धुतले जातात अशी भक्‍तांची भावना आहे. प्रत्‍येक कुंभ मेळाव्यात दैवी शक्‍तीचा वावर असतो असे मानण्यात येते. या दैवी शक्‍ती साधू-संतांसोबत नागा साधूंचे रूप धारण करून अमृत स्‍नान करतात अशी श्रद्धा आहे. जेंव्हा नागा साधूंची टोळी चालते, तेंव्हा दैवी शक्‍ती त्‍यांच्यामध्ये सामील होतात आणि शिव शंभूचा जय-जयकार करतात.

जर या गोष्टी मिळाल्या तर...

महाकुंभा दरम्‍यान त्‍यांच्या हातातील फूल-माळ किंवा कोणता प्रसाद जरी सर्वसामान्यांना मिळाला तरी असे मानले जाते की त्‍या व्यक्‍तीचे दुर्भाग्‍यही सौभाग्‍यात बदलते. सोबतच त्‍याचे सारे पाप धुतले जातात आणि त्‍या व्यक्‍तीच्या मृत्‍यूनंतर त्‍याला स्‍वर्ग प्राप्त होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news