महाकुंभ! 20 कोटींवर हिंदू येणार!

6 हजार हेक्टरवर यूपीचा 76 वा जिल्हा; यावेळी सर्वच डिजिटल
mahakhumbh 2025
महाकुंभ! 20 कोटींवर हिंदू येणार!Pudhari photo
Published on
Updated on

प्रयागराज : वृत्तसंस्था

जगभरातील कोट्यवधी हिंदूंचा आध्यात्मिक महोत्सव असलेल्या महाकुंभासाठी प्रयागराजलगत वसविण्यात आलेली कुंभनगरी हा 1 डिसेंबर 2024 ते 31 मार्च 2025 पर्यंत उत्तर प्रदेशातील 76 वा जिल्हा असेल. गंगा-यमुना आणि अद़ृश्य सरस्वती नदीच्या संगमावर प्रयागराजमध्ये दर 12 वर्षांनी महाकुंभ होतो. 13 जानेवारी 2025 पासून महाकुंभाला सुरुवात होणार असून, प्रयागराजमध्ये दर 12 वर्षांनी महाकुंभाचे आयोजन केले जाते. यावेळेचा महाकुंभ हा डिजिटल महाकुंभ असेल. चार तालुके आणि 67 गावांसह 6 हजार हेक्टरमध्ये पसरलेली संपूर्ण कुंभनगरी कुणालाही मोबाईलवर बघता येणार आहे. गुगल आणि महाकुंभ मेळा प्राधिकरणात त्यासाठी करारही झाला आहे. त्यानुसार महाकुंभ नेव्हिगेशन मॅप तयार करण्यात आला आहे. यात सर्व माहिती एका क्लिकवर मिळेल.

आकडे बोलतात...

13 जानेवारी ते 31 मार्च या 45 दिवसांत महाकुंभ पार पडेल.

10 कोटी लोकांची सुविधा स्नानाच्या विशेष तारखांना असेल.

45 कोटी लोक येतील, असे गृहित धरून व्यवस्था आहे.

2400 कॅमेरे अवघ्या कुंभनगरीत बसवले आहेत.

328 कॅमेरे आर्टिफिशियल इन्टेलिजन्सने सज्ज आहेत. ते भामट्यांना हेरतील.

56 पोलिस ठाणे, 155 चौक्या आणि 60 अग्निशमन केंद्रे निर्माण केली आहेत.

37 हजार जवान 24 तास सज्ज असतील. डिजिटल पद्धतीने ते एकमेकांशी जोडले गेलेले असती.

2500 कोटी रुपये या वेळी महाकुंभावर खर्च करण्यात येणार आहेत.

10 झोन, 25 सेक्टरमध्ये महाकुंभ विभागला गेला आहे.

3 पोलिस ठाणी आणि 10 गुलाबी चौक्या महिलांसाठी असतील.

700 बोटींवर पाणबुडे तैनात असतील.

200 वर स्थानिकांना पाणबुड्यांचे प्रशिक्षण दिलेले आहे.

1.5 लाख शौचालये आणि मुतार्‍यांची सोय केली आहे.

10 कोटी भाविक रेल्वेगाड्यांनी येतील, असा अंदाज आहे.

1900 हेक्टरमध्ये पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news