

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्यप्रदेशातील धार्मिक महत्व असलेल्या १७ शहरांमध्ये दारु बंदी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री मोहनलाल यादव यांनी ही माहिती दिली आहे. मध्येप्रदेश सरकारने यासंदर्भात निर्णय घेतला आहे. यावर्षीचे वित्तीय वर्ष संपल्यानंतर हा निर्णय लागू होईल
उज्जैन, दातिया, पन्ना, मंडला, मुलताई, मंदसौर, मैहर, ओंकारेश्वर, महेश्वर, ओरछा, चित्रकूट, अमरकंटक, सलकनपुर, बर्मानकला, लिंगा, कुंडलपूर, अरमानपूर, बांदलपूर या शहरामध्ये दारुबंदी होणार आहे. मध्यप्रदेश सरकाच्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय झाला. हळू हळू दारुबंदीची व्याप्ती वाढवली जाणार आहे. असे या बैठकीत उपस्थित असलेल्या मंत्र्यांकडून सांगण्यात आले.