

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर (Fire incident Hospital In MP) शहरातील एका खासगी रुग्णालयाला भीषण आग लागल्याची घटना घडली. आग लागल्यानंतर रुग्णालयात मोठी धावपळ उडाली. तातडीने अग्निशमन दल आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. रुग्णालयातील १९० रुग्णांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. प्राथमिक माहितीनुसार, ही आग इलेक्ट्रिकल शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाने तत्परता दाखवत आगीवर नियंत्रण मिळवले. प्रशासनाने या घटनेचा तपास सुरू केला असून रुग्णालयातील सुरक्षा उपायांबाबत चौकशी केली जात आहे. या घटनेची माहिती वृत्तसंस्था 'पीटीआय'ने दिली आहे.