MP News | लाडक्या बहिणीसाठी खूशखबर! आता ४५० रुपयांना मिळणार सिलिंडर

मध्यप्रदेश सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
Gas cylinder
लाडकी बहिण योजनेतील पात्र महिलांना 450 रुपयांना एलपीजी सिलिंडर देण्यात येणार आहे. File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री मोहन यादव यांनी राबविलेल्या लाडकी बहिण योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आता त्यांनी रक्षाबंधन सणाच्या तोंडावर लाडक्या बहिणीसाठी आणखी एक भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेतील पात्र महिलांना 450 रुपयांना एलपीजी सिलिंडर देण्यात येणार आहे. आज (दि.३०) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Gas cylinder
'लाडकी बहिण' याेजनेला अर्थ खात्‍याचा विरोध? अजित पवारांनी केला मोठा खुलासा

सुमारे 160 कोटी रुपये खर्च येणार

शहरी विकास आणि गृहनिर्माण मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी सांगितले की, आमच्या सरकारने भगिनींना 450 रुपयांना गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. सध्या गॅस सिलिंडर सुमारे ८४८ रुपयांना मिळतो. यामध्ये भगिनींना 450 रुपये द्यावे लागतील. उर्वरित ३९८ रुपयांची परतफेड राज्य सरकार करणार आहे. यासाठी सुमारे 160 कोटी रुपये खर्च येणार आहे. भगिनींबाबत आमची घोषणा होती की, गॅस सिलिंडर अनुदानावर दिले जातील.

Gas cylinder
‘माझी लाडकी बहिण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 2 महिन्यांनी वाढवली

महिलांच्या खात्यात 1500 रुपये थेट जमा होणार

मध्य प्रदेशचे भाजप सरकारही रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींना खास भेटवस्तू देणार आहे. 1 ऑगस्ट रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यात 250 रुपयांची स्वतंत्र रक्कम वाटप करण्यात येणार आहे. भाजप सरकार लाडक्या बहिणींना दरमहा 1250 रुपयांची आर्थिक मदत करते. म्हणजेच या महिन्यात लाडली बहीण योजनेशी संबंधित महिलांच्या खात्यात 1500 रुपये थेट जमा केले जाणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news