

पुढारी ऑनलाईन डेस्क : लखनऊमधील इंदिरा कालव्याजवळ गुरुवारी (दि.23) मध्यरात्री तीन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले, असे बीबीडी पोलिसांनी सांगितले. ही घटना बीबीडी पोलिस स्टेशन परिसरात घडली. अशी माहिती वृत्तसंस्था 'पीटीआय'ने त्यांच्या सोशल मीडिया हँडल 'एक्स'वर दिली आहे.
मागून येणाऱ्या ट्रकने एका एसयूव्हीला धडक दिली आणि एक व्हॅन तिच्यावर आदळली. या अपघातात व्हॅनमध्ये प्रवास करणारे तीन आणि एसयूव्हीमध्ये असलेल्या एका व्यक्तीसह चार जणांचा मृत्यू झाला आणि सात जण जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले.