LPG Price Cut : सणासुदीत LPG गॅसच्या किंमतीत मोठी घट, सिलिंडर तब्बल ५१ रुपयांनी स्वस्त

Commercial LPG Price latest news: हॉटेल, रेस्टॉरंट व्यावसायिकांना मोठा दिलासा
LPG Price Cut
LPG Price Cut
Published on
Updated on

LPG cylinder price September 2025

नवी दिल्ली: महिन्याच्या पहिल्याच दिवशी हॉटेल, रेस्टॉरंट व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण १ सप्टेंबरपासून १९ किलो वजनाचा एलपीजी (LPG) सिलिंडर तब्बल ५१.५० रूपयांनी स्वस्त झाला आहे. याआधी ऑगस्टमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत कमी करण्यात आली होती. तर घरगुती १४ किलो वजनाच्या गॅस सिलिंडर किंमतीत अद्याप तरी कोणताही बदल झालेला नाही.

व्यावसायिक सिलिंडर ५१.५० रुपयांनी स्वस्त

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिकांना महागाईपासून मोठा दिलासा मिळाला आहे. ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी राजधानी दिल्ली ते मुंबईपर्यंत एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती ५१.५० रूपयांनी स्वस्त झाली आहे. आजपासून नवे दर लागू करण्यात आले आहेक. राजधानी दिल्लीत सिलिंडरच्या किंमत १५८० रू. इतकी झाली आहे. घरगुती गॅसच्या किंमती मात्र 'जैसे थे'च आहेत. गेल्या काही महिन्यांपासून यामध्ये कोणताही बदल झालेला नाही.

घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती 'जैसे थे'

व्यावसायिक LPG गॅसच्या दरात सातत्याने घसरण सुरूच आहे. मात्र घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये गेल्या काही दिवसांत कोणताही मोठा बदल झालेला नाही. मागील ४ ते ५ महिन्यांपासून गॅसच्या किंमती जैसे थे आहेत. घरगुती LPG गॅसच्या किंमतीमध्ये शेवटचा ८ एप्रिलमध्ये बदल करण्यात आला होता, त्यानंतर अद्याप कोणताही बदल झालेला नाही. सध्या १४ किलो वजनाचा घरगुती गॅस सिलिंडर मुंबईमध्ये ८५२.५० रूपयांना मिळतोय. तर दिल्लीमध्ये ८५३, चेन्नई ८६८ आणि कोलकाता ८७९ रूपयांना मिळतोय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news