Mangaluru port LPG crude arrival |एलपीजी, कच्चे तेलाची दोन जहाजे दाखल

Mangaluru port LPG crude arrival |
Mangaluru port LPG crude arrival |एलपीजी, कच्चे तेलाची दोन जहाजे दाखल-
Published on
Updated on

मंगळुरू; वृत्तसंस्था : पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे भारतातील इंधन पुरवठ्यावर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मंगळुरू बंदरात एलपीजी आणि कच्च्या तेलाच्या दोन जहाजांची आवक झाली असून यामुळे घरगुती ग्राहक व तेल कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

‘पिक्सिस पायोनियर’ हे जहाज 16,715 मेट्रिक टन एलपीजी घेऊन रविवारी सकाळी न्यू मंगळुरू बंदरात दाखल झाले. हे जहाज अमेरिकेतील नेदरलँड, टेक्सास येथून आले आहे. या मालाची स्वीकृती ‘सी लॉर्ड कंटेनर्स’ या एजिस लॉजिस्टिक्सच्या उपकंपनीकडून करण्यात आली. मंगळुरू बंदरात या कंपनीकडे 82,000 मेट्रिक टन क्षमतेचे एलपीजी साठवण टर्मिनल आहे. दरम्यान, ‘अक्वा टायटन’ हे दुसरे जहाज शनिवारी रात्री रशियातील प्रिमोर्स्क येथून 96,100 मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन बंदरात पोहोचले. हा माल न्यू मंगळुरू बंदराच्या अँकरजवरील एसपीएम सुविधेत मंगळुरू रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेडकडून स्वीकारण्यात आला. या दोन्ही जहाजांच्या आगमनामुळे देशातील इंधन पुरवठा साखळी स्थिर ठेवण्यास मदत होणार असून संभाव्य तुटवड्याचा धोका कमी झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news