

पुढारी ऑनलाईन डेस्कः मुंबई येथील प्रसिद्ध व अत्याधुनिक सेवा सुविधा उपलब्ध असलेल्या लिलावती रुग्णालयात काळ्या जादूसाठी लागणारे साहित्य सापडल्याने खळबळ उडाली आहे. हॉस्पिटलचे सध्याचे ट्रस्टींच्या ऑफिसमधील फ्लोअरच्या फरशीखाली या वस्तू सापडल्या आहेत. ऑफिसधील फरशी खणल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
विजय मेहता हे लिलावती हॉस्पिटले ट्रस्टी होते. त्यांच्यावर सध्या हॉस्पिटलच्या व्यवहारामधून १२५० कोटींचा अपहार केल्याचा आरोप आहे. त्यांच्या केबीनचे रिनोव्हेशन करताना फरशीखाली आठ कलश सापडले आहेत यामध्ये मानवी हाडे, केस, कवटी, तांदूळ या वस्तू आढळल्या. या सर्व गोष्टी काळी जादू करण्यासाठी वापरल्या जातात.
सध्या हॉस्पिटलमध्ये जुन्या व नव्या ट्रस्टींमध्ये वाद सुरु आहे. जुन्या ट्रस्टिंविरोधात १२५० कोटींचा अपहार केल्याचा खटला दाखल केला आहे. बनावट ऑर्डर व रेकॉर्ड दाखवून हा अपहार केला असल्याचा दावा आहे. लिलावती हॉस्पिटले संस्थापक किशोर मेहता यांचे भाऊ विजय मेहता व त्यांचे नातेवाईक लिलावती हॉस्पिटलचे ट्रस्टी होते. त्यांच्याविरोधात हा दावा आहे. पण त्यांनी हा दावा फेटाळला आहे. हे आरोप तथ्यहिन व निराधार असल्याचे जुन्या ट्रस्टींनी म्हटले आहे. त्यांच्याविरोधतात एफआरआय दाखल करण्यात आली आहे. यामध्ये पैशांची अफरातफरीचा आरोप केला आहे याचबरोबर टॅक्स चोरीची आणखी एक तक्रार त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आली आहे.
सध्याचे ट्रस्टी प्रशांत मेहता व त्यांची आई चारु मेहता यांना त्रास देण्यासाठी ही काळी जादू केली आहे. अशा आशयाची तक्रार हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी माजी ट्रस्ट्रींविरोधात महाराष्ट्र जादूटोणा कायद्यातंर्गत दाखल केली आहे. यासाठी काही पुरावेही जोडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विजय मेहता यांचे चिरंजीव चेतन मेहता यांनी मात्र या आरोपांचा इन्कार केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी लिलावती हास्पिटले संस्थापक किशारे मेहता हे २००२ मध्ये उपचारांसाठी विदेशात गेले होते. यावेळी त्यांचे भाऊ विजय मेहता यांनी हॉस्पिटलचा तात्पूरता पदभार स्वीकारला. त्यांनी आपला मुलगा व भाचा यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे ट्रस्टी नियुक्त केले होते. व किशोर मेहता यांना पदावरुन हटवले होते. यानंतर कायदेशीर लढाई लढून किशोर मेहता यांनी हे पद २०१६ साली परत मिळवले होते.