

पुढारी ऑनलाईन डेस्क : गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज निधन झाले. मागच्या एक महिन्यापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. कालपासून (ता.०६) प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. दरम्यान आज सकाळी ८ वाजून १२ मिनीटांनी निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. लतादीदींचे भारतातच नाहीतर जगभरात नाव होते. लता दिदींच्या निधनाचे अनेक मान्यवरांनी, भारतातील नेत्यांनी श्रद्धांजली वाहत शोक व्यक्त केला.
लता दीदींच्या गाण्यांनी विविध प्रकारच्या भावना प्रकट केल्या. लतादीदींनी अनेक दशकांपासून भारतीय चित्रपट जगतातील स्थित्यंतरे जवळून पाहिली. चित्रपटांच्या पलीकडे, ती नेहमीच भारताच्या प्रगतीबद्दल उत्कट होती. तिला नेहमीच एक मजबूत आणि विकसित भारत पाहायचा होता.
आपल्या सुरांच्या गोडव्याने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
अनेक भाषांत गायलेल्या गाण्यांच्या रूपात सांस्कृतिक विश्वात त्या अजरामर राहतील..! pic.twitter.com/356ovT7SWE
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) February 6, 2022