IndiGo flight : कुवेत-दिल्ली विमानाला अपहरणाची धमकी; १८० प्रवाशांचा जीव टांगणीला, अहमदाबाद विमानतळावर हाय-व्होल्टेज ड्रामा

IndiGo flight
Published on
Updated on

अहमदाबाद : कुवेतवरून दिल्लीच्या दिशेने झेपावलेल्या इंडिगोच्या विमानात बॉम्बची आणि अपहरण करण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली. या धमकीनंतर सुरक्षेच्या कारणास्तव विमान तातडीने गुजरातच्या अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आले. विमानात सुमारे १८० प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते, जे शुक्रवारी सकाळी ६:४० च्या सुमारास सुरक्षितपणे अहमदाबादमध्ये उतरले.

टिश्यू पेपरवर लिहिली होती धमकी

विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कुवेतहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या या विमानाचा मार्ग हवेतच बदलण्यात आला. विमानात एका प्रवाशाला हाताने लिहिलेली एक चिठ्ठी सापडली, ज्यात विमान हायजॅक करण्याची आणि बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. विशेष म्हणजे ही धमकी एका 'टिश्यू पेपर'वर लिहिलेली होती. ही माहिती मिळताच वैमानिकाने तत्परता दाखवत तातडीने 'एअर ट्रॅफिक कंट्रोल'शी (ATC) संपर्क साधला आणि विमानाची दिशा बदलून ते अहमदाबादकडे वळवले.

१८० प्रवाशांचा जीव टांगणीला

विमान अहमदाबाद विमानतळावर उतरताच तातडीने सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण विमानाचा ताबा घेऊन कसून तपासणी सुरू केली. 'पीटीआय'ने दिलेल्या वृत्तानुसार, आतापर्यंतच्या तपासात विमानामध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही.

विमानतळ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, सर्व सुरक्षा निकषांची पूर्तता झाल्यानंतर आणि अंतिम मंजुरी मिळाल्यानंतरच विमानाला पुढील प्रवासासाठी परवानगी दिली जाईल. दरम्यान, ही धमकी कोणाकडून देण्यात आली आणि त्यामागील नेमका हेतू काय होता, याचा तपास सुरक्षा यंत्रणा युद्धपातळीवर करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news