'आरोपी संजय रॉयला जामीन द्यायचा का? : कोलकाता प्रकरणी न्यायाधीश असे का म्हणाल्‍या?

सुनावणीवेळी अनुपस्थितीवर सीबीआयला फटकारले
Kolkata Rape-Murder Case
कोलकाता प्रशिणार्थी डॉक्‍टर बलात्‍कार-हत्‍या प्रकरणातील आरोपी संजय रॉय.File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कोलकाता येथील आरजी कार रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणी सीबीआयचे वकील आणि तपास अधिकाऱ्यांच्‍या अनुपस्थितीवर सियालदह न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. आरोपी संजय रॉय याला जामीन द्यायचा का?, असा सवाल करत त्‍याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीही सुनावली.

न्‍यायालयात काय झाले?

कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या प्रकरणाचा तपास कोलकाता पोलिसांकडून सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉयच्या जामीन अर्जावर शुक्रवारी (दि.६) सियालदह न्यायालयात सुनावणी झाली. रॉय याच्या वकिलांनी जामिनासाठी युक्तिवाद करण्यास सुरुवात केली. यावेळी सीबीआयचे तपास अधिकारी आणि सरकारी वकील दोघेही न्यायालयात उपस्थित नव्हते. यावर नाराजी व्‍यक्‍त करत न्यायाधीश पामेला गुप्ता यांनी सवाल केला की, संजय रॉय यालाजामीन द्यायचा का? सीबीआयची ही अत्यंत हलगर्जी वृत्ती आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे."

४० मिनिटांच्या विलंबानंतर सीबीआयचे वकील न्यायालयात पोहोचले

सुनावणीदरम्यान सीबीआयचे वकील ४० मिनिटे उशिरा आले. बचाव पक्षाच्या वकिलांनीही या विलंब येण्‍यावर आक्षेप घेतला. न्यायाधीशांनी सीबीआयवर नाराजी व्‍यक्‍त केली. संजय रॉय याला न्‍यायालयात आभासी (व्हर्च्युअल ) माध्यमातून न्‍यायालयात हजर करण्‍यात आले होते. सुनावणीवेळी तो रडू लागला. सीबीआयने त्‍याच्‍या जामिनाला विरोध केला. सुनावणीवेळी तो रडू लागला. सीबीआयने त्‍याच्‍या जामिनाला विरोध केला. अखेर बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्‍यायाधीशांनी आरोपी संजय रॉय याला १४ दिवसांची न्‍यायालयीन कोठडी सुनावली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news