सीआरपीएफ शाळा स्फोटाची जबाबदारी खलिस्तान्यांनी स्वीकारली

CRPF School Blast : गृह मंत्रालयाने दिल्ली पोलिसांकडून मागवला अहवाल
CRPF School Blast
सीआरपीएफ शाळा स्फोटाची जबाबदारी खलिस्तान्यांनी स्वीकारल्याची माहिती समोर आली आहे.
Published on
Updated on

नवी दिल्ली : दिल्लीतील रोहिणी सेक्टर 14 मधील सीआरपीएफ शाळेलगत झालेल्या स्फोटाची जबाबदारी खलिस्तानवाद्यांनी स्वीकारली आहे. टेलिग्रामवरील जस्टिस लीग इंडिया ग्रुपवर हा संदेश आला आहे. आम्ही कधीही, कुठेही हल्ला करू शकतो, असे यात त्यांनी म्हटले आहे. (CRPF School Blast)

सध्या तपास यंत्रणा संदेशाची चौकशी करत आहेत. एनआयए आणि नॅशनल सिक्युरिटी गार्डकडूनही स्फोटाचा तपास सुरू आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने दिल्ली पोलिसांकडून त्याबाबतचा अहवाल मागवला आहे. मे महिन्यात 150 हून अधिक शाळांमध्ये बॉम्बस्फोटाच्या धमक्यांशी संबंधित ई-मेल प्राप्त झाले होते, या अंगानेही तपास सुरू आहे. (CRPF School Blast)

स्फोटके पिशवीत, पिशवी खड्ड्यात

शाळेच्या भिंतीलगत एका पॉलिथिन पिशवीत स्फोटके ठेवण्यात आली होती. पिशवी फूटभर खोल खड्ड्यात ठेवलेली होती. वरून कचरा टाकण्यात आला होता. कुणाचेही लक्ष स्फोटकांवर जाऊ नये, त्याची पुरेपूर काळजी संबंधितांनी घेतलेली होती, असे दिल्ली पोलिसांनी सोमवारी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news