

Muslim Panchayat member cremates Hindu woman in Kerala
तिरुअनंतपुरम : केरळमध्ये एक हृदयस्पर्शी घटना घडली असून. भारताच्या सर्वधर्मसमभाव संकल्पनेला बळ देणारी आहे. राखी नावाच्या ४४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या शेवटच्या इच्छेनुसार हिंदू परंपरेने अंत्यसंस्कार करण्यात आले. पण तिचे कोणीही नातेवाईक उपस्थित नसल्याने चिट्टट्टुमुक्कू येथील पंचायत सदस्य टी. सफीर यांनी त्यांचा मूलगा बनून पूर्ण हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले. विषेश म्हणजे ज्या संस्थेत ही महिला होती ती संस्था ख्रिश्चन नन्स चालवतात.
याबाबत अधिक माहिती अशी की राखी नामक महिला मानसिक रुग्ण होती ती केरळमधील तिरुवनंतपुरममधील कडिनमकुलम येथील बेनेडिक्ट मेन्नी सायकियो सोशल रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये संस्थेत दाखल होती. ती या मानसिक आजारातून बरी होत असतानाचा तिला कर्करोगाने गाठले व ती अंथरुणाला खिळून होती. मृत्यूच्या जवळ असताना तिने संस्थेतील अधिकाऱ्यांकडे शेवटची इच्छा व्यक्त केली की, तिच्यावर हिंदू रिवाजानुसार अंत्यसंस्कार करावेत. दुर्दैवाने, तिला तिच्या कुटुंबाबद्दल किंवा घराच्या पत्त्याबद्दल काहीच आठवत नव्हते.
शुक्रवारी तिचा मृत्यू झाल्यानंतर, हे केंद्र चालवणाऱ्या ख्रिश्चन नन्सनी चिट्टट्टुमुक्कू येथील पंचायत सदस्य टी. सफीर यांच्याशी संपर्क साधला. राखीच्या शेवटच्या इच्छेविषयी ऐकून, मुस्लिम असलेले सफीर यांनी तिचा मुलगा म्हणून अंत्यसंस्कार करण्याचे ठरवले.
दोन आठवड्यांपूर्वी याच केंद्रातील एका व्यक्तीचा आजारामुळे मृत्यू झाला होता. त्यावेळीही त्यांनी हिंदू परंपरेनुसार त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले होते. सफीर यांच्या या कृतीची सोशल मीडियावर 'खरी केरळ स्टोरी' म्हणून प्रशंसा होत आहे.
याबाबात बोलताना सफीर यांनी सांगितले की माझ्या धर्माने मला प्रत्येक मानवी शरीराचा आदर करायला शिकवले आहे, मग ती व्यक्ती जवळची असो वा अनोळखी. मी माझ्या प्रभागातील सर्व धर्मांच्या अंत्यसंस्कारांमध्ये आणि इतर कार्यक्रमांमध्ये भाग घेत असतो, त्यामुळे मला या विधींची थोडीफार माहिती होती. काझकूटम येथील स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनीही मला मार्गदर्शन केले. माझ्या धर्मामुळे मला हे काम करताना कोणतीही अडचण आली नाही,