kerala Mens Protest |केरळचे पुरुष कार्डबोर्डचे सुरक्षाकवच घेऊन करत आहेत आंदोलन.. ही चर्चेतील घटना ठरली कारणीभूत!

सोशल मिडीयावरील ट्रोलिंगचा बळी ठरलेल्या दीपकच्या मृत्‍यूनंतर उचलले पाऊल
kerala Mens Protest
दीपक या तरुणाच्या मृत्‍यूनंतर अनेकजन कार्डबोर्डचे सुरक्षा कवच घालून आंदोलन करत आहेत.
Published on
Updated on

Kerala Story 16 जानेवारी रोजी सोशल मिडीयावर फॉलोअर्स वाढवण्यासाठी एका तरुणीने केलेल्या व्हिडीओमुळे दीपक नावाच्या एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता. केरळमधी कोझीकोडे येथील एका गर्दीने भरलेल्या बसमध्ये हा प्रकार घडला होता. शिमजीत मुस्तफा नावाची एक तरुणी गर्दी असलेल्या बसमध्ये एक व्हिडीओ शूट करत होती. यावेळी दीपक नावाचा तरुण आपल्याला कसा चुकीचा स्पर्श करतो आहे. याचे चित्रण तीन केले. हे सर्व तिने मुद्दामहून केले. पोस्ट केल्यानंतर दीपकला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. याच ताणातून दीपकने आत्‍महत्‍या केली होती.

या घटनेचा निषेध म्हणून केरळमध्ये अनेक पुरुष अनोखे आंदोलन करत आहेत. अनेक पुरुषांनी बसमधून प्रवास करताना स्वतःच्या अंगावर कार्डबोर्डचे खोके (Boxes) घालून प्रवास करण्यास सुरुवात केली आहे. या खोक्यांमुळे गर्दीच्या बसमध्ये कोणाशीही (विशेषतः महिलांशी) शारीरिक स्पर्श होणार नाही, असा दावा या आंदोलक पुरुषांनी केला आहे. "आम्ही सुरक्षित राहण्यासाठी हे कवच वापरत आहोत," असे त्यांचे म्हणणे आहे.

तर काही लोक हात वर करुन प्रवास करत आहेत काही व्हायरल व्हिडिओंमध्ये तरुण आणि मध्यमवयीन पुरुष बसमध्ये उभे असताना आपले दोन्ही हात वर (पाइपला न धरता किंवा वरच्या रॉडला धरून) करून उभे असलेले दिसत आहेत. चुकूनही कोणाला हात लागू नये आणि नंतर विनयभंगाचा खोटा आरोप होऊ नये, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. सोशल मीडियावर #JusticeForDeepak आणि #MenLivesMatter या हॅशटॅगसह अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. यामुळे दीपकसारखे अनेकांचे बळी जाऊ नयेत असे अनेकांचे म्हणने आहे.

ट्रोलिंगचा बळी ठरला दीपक, काय आहे घटनेची पार्श्वभूमी

शिमजीता मुस्तफा (३५ वर्ष), जी एक ब्लॉगर आणि माजी पंचायत सदस्य आहे, तिने १६ जानेवारी रोजी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला. तिने असा आरोप केला की, पय्यानूर येथे एका खाजगी बसमधून प्रवास करताना दीपक यू. (४२ वर्ष) या व्यक्तीने तिला गर्दीचा फायदा घेऊन चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि तिचा विनयभंग केला. असा आरोप करत तिने आपल्या अकाऊंटवरून व्हिडीओ पोस्ट केला होता. हा मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आणि त्याला २० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. यामुळे दीपकला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग आणि टिकेला सामोरे जावे लागले. या घटनेमुळे दीपक प्रचंड मानसिक दडपणाखाली होता. आपली सामाजिक प्रतिष्ठा धुळीला मिळाल्याच्या दुःखातून, १८ जानेवारी रोजी त्याच्या वाढदिवशीच दीपकने कोझिकोड येथील आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. दीपक एका खाजगी कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करत होता.

दीपकच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी शिमजीता मुस्तफाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी केलेल्या तपासात काही गोष्टी स्पष्ट झाल्या. बसमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यात विनयभंगासारखी कोणतीही संशयास्पद हालचाल दिसली नाही. पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, शिमजीताने दीपकचे ७ विविध व्हिडिओ बनवले होते आणि ते चुकीच्या पद्धतीने प्रसारित केले.

शिमजीता मुस्तफाला अटक

दीपकला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी शिमजीता मुस्तफाला २१ जानेवारी २०२६ रोजी अटक केली. सध्या ती १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. पण काही चुकीच्या व्हिडीओमुळे अनेकांचा हकनाक बळी जात असल्याचे या घटनेतून स्पष्ट होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news