Kerala Shocking News : पत्नीच्या दोन प्रियकरांचा अमानुष छळ; केरळमधील घटनेने देश हादरला

घरी बोलावून नग्न केले, नखे उपटली, गुप्तांगावर मारले स्टेपलर; दाम्पत्य अटकेत
Kerala Shocking News
प्रातिनिधिक छायाचित्र (File Photo)
Published on
Updated on

तिरुवनंतपूरम : पत्नीच्या अनैतिक संबंधांची माहिती मिळाल्यानंतर संतापलेल्या पतीने, त्याच पत्नीच्या मदतीने तिच्या दोन प्रियकरांना घरी बोलावून केलेल्या अमानुष छळाची घटना केरळमध्ये उघडकीस आली आहे. या अंगावर शहारे आणणार्‍या प्रकाराने संपूर्ण देश हादरला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पती-पत्नीला अटक केली असून, एका विशेष पथकामार्फत या दोन्ही प्रकरणांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक आर. आनंद यांनी दिली.

कसा झाला उलगडा?

5 सप्टेंबरच्या रात्री केरळमधील पत्तनमथिट्टा जिल्ह्यातील पुथुमन येथे एक 29 वर्षीय तरुण गंभीर जखमी अवस्थेत सापडला. स्थानिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले असता, आपल्या प्रेयसीच्या घरच्यांनी मारहाण केल्याची खोटी कहाणी त्याने पोलिसांना सांगितली. मात्र, त्याच्या बोलण्यात विसंगती आढळल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, अनैतिक संबंध, सूड आणि अमानुष छळाचा हा धक्कादायक प्रकार समोर आला. आरोपी पती-पत्नीने तोंड उघडल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे आपण खोटी कहाणी रचल्याचे पीडित तरुणाने सांगितले. तपासात, याच जोडप्याने आणखी एका तरुणासोबत असाच प्रकार केल्याचे उघड झाले. 5 सप्टेंबरच्या घटनेतील पीडिताने संपूर्ण हकीकत सांगितल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि 12 सप्टेंबर रोजी आरोपी जोडप्याला अटक केली.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोईप्पूरम गावातील रहिवासी असलेला जयेश हा अर्थमूव्हर ऑपरेटर म्हणून काम करतो, तर त्याची पत्नी रेशमी एका केटरिंग फर्ममध्ये कामाला होती. याच दरम्यान रेशमीचे पतीच्या दोन मित्रांसोबत अनैतिक संबंध जुळले. पत्नीच्या व्हॉटस्अ‍ॅप चॅटमधून जयेशला या संबंधांची माहिती मिळाली. यानंतर त्याने दोघा मित्रांचा बदला घेण्याचा कट रचला. आपले तुटणारे लग्न वाचवण्यासाठी रेशमीदेखील पतीच्या या क्रूर योजनेत सामील झाली.

असा केला अमानुष छळ

पहिला प्रियकर :

1 सप्टेंबर रोजी रेशमीने तिच्या 19 वर्षीय प्रियकराला घरी बोलावले. जयेश स्वतः त्याला बाईकवरून घरी घेऊन आला. घरात येताच दोघांनी त्याला मारहाण करून नग्न केले. जयेशने मोबाईलचा कॅमेरा सुरू करून त्याला रेशमीसोबत संबंध ठेवण्यास सांगितले. तरुणाने नकार देताच, दोघांनी त्याचे हात बांधून त्याला छताला लटकावले. त्यानंतर प्लायरने (पक्कड) त्याची नखे उपटली आणि बेदम मारहाण केली.

दुसरा प्रियकर :

आता रेशमीच्या दुसर्‍या प्रियकराची वेळ होती. ओणमच्या बहाण्याने 5 सप्टेंबर रोजी जयेश आणि रेशमीने त्याला घरी बोलावले. घरात येताच दोघांनी त्याच्या डोळ्यांत पेपर स्प्रे मारला आणि मारहाण सुरू केली. त्याचेही हात बांधून त्याला छताला लटकावण्यात आले. जयेशने कॅमेरा सुरू करून रेशमीला लोखंडी रॉडने मारण्यास सांगितले. इतकेच नाही, तर रेशमीने स्टेपलर आणून दोघांनी मिळून त्याच्या गुप्तांगावर अनेक पिना मारल्या. तरुणाची प्रकृती बिघडल्यावर त्याला स्कुटीवर बसवून पुथुमन येथील निर्जनस्थळी सोडून दिले आणि या अवस्थेसाठी आपल्या (खोट्या) प्रेयसीच्या घरच्यांचे नाव घे, नाही तर जीव गमवावा लागेल, अशी धमकी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news