

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला इंडिया आघाडीतील मित्रपक्षांचे समर्थन वाढतच चालले आहे. आता शरद पवार यांनी आम आदमी पक्षाला दिल्ली निवडणुकीत समर्थन दिले आहे. त्याबद्दल अरविंद केजरीवाल यांनी शरद पवारांचे आभार मानले आहेत. आम्हाला समर्थन दिल्याबद्दल धन्यवाद, आभारी आहे, अशी पोस्ट अरविंद केजरीवाल यांनी ‘एक्स’वर केली आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी 'आप'ला समर्थन जाहीर केले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत, माझी भावना अशी आहे की आपण अरविंद केजरीवाल यांना मदत करावी, असे शरद पवार म्हणाले आहेत. आता पर्यंत इंडिया आघाडीतील समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षांनी आम आदमी पक्षाला समर्थन दिले आहे. या अगोदरही केजरीवाल यांनी सर्व पक्षांचे समर्थनासाठी आभार मानले आहेत.