पुढारी ऑनलाईन डेस्क : निसर्गाने अतुलनीय सौंदर्य बहाल केलेल्या जम्मू-काश्मीरला पृथ्वीचा स्वर्ग, अशी सार्वत्रिक मान्यता का आहे? या प्रश्नाचे उत्तर दाल सरोवर आणि झाबरवान हिल्स यांच्यामध्ये वसलेले आशियातील सर्वात मोठे ट्यूलिप गार्डन देते. ( Kashmir’s Tulip Garden) मागील महिन्यात हे गार्डन पर्यटकांसाठी खुलं करण्यात आले आहे. मागील १० दिवसांमध्ये तब्बल २.५ लाख पर्यटकांना गार्डनला भेट देत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
जम्मू काश्मीरमधील ट्यूलिप गार्डन हे आशियातील सर्वात मोठे ट्यूलिप गार्डन आहे. तब्बल ३० 30 हेक्टरमध्ये ते पसरलेले आहे. येथे 17 लाखांहून अधिक आणि 75 हून जास्त जातीचे ट्यूलिप फुले पाहायला मिळतील. ट्युलिप गार्डन हे जम्मू-काश्मिरच्या पर्यटन स्थळांपैकी महत्वाचं ठिकाण मानलं जातं. यावर्षी मागील दहा दिवसांमध्ये २.५ लाखांहून अधिक पर्यटकांना गार्डनला भेट देत नवा विक्रम प्रस्थापित केला.
या वर्षी, ७४ प्रकारच्या ट्यूलिप प्रदर्शित केल्या आहेत, तसेच बागेत हायसिंथ, डॅफोडिल्स, मस्करी आणि सायक्लेमेन्स सारख्या वसंत ऋतूतील फुलांनी फुलले आहे. गेल्या वर्षी ४.६५ लाखांहून अधिक पर्यटकांनी बागेला भेट दिली होती, तर २०२३ मध्ये ३.६५ लाख पर्यटकांनी ट्यूलिप गार्डनला भेट थिदली होती.