

बंगळूर : सार्वजनिक सभेत पोक्सो पीडितेचे नाव उघड केल्याबद्दल माजी मंत्री बी. श्रीरामलू यांच्याविरुद्ध पोक्सो आणि बालन्याय कायद्यांतर्गत बळ्ळारी शहर महिला पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 1 जानेवारी रोजी शहरात झालेल्या संघर्ष आणि हत्येचा निषेध करण्यासाठी भाजपने 17 जानेवारी रोजी बळ्ळारी एपीएमसी परिसरात निषेध सभा आयोजित केली होती. श्रीरामलू यांनी सभेत भाषण देताना पोक्सो पीडितेचे नाव घेतले. त्यामुळे त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला.
आमदार भरत रेड्डी यांनी शहरातील एका शाळेतील एका विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. तक्रारीत पुढे म्हटले आहे की, श्रीरामलू यांनी विद्यार्थिनीचे नाव, शाळा, वर्ग आणि जातदेखील उघड केली. पोक्सो कायद्याअंतर्गत पीडितेचे नाव आणि इतर माहिती उघड करता येत नाही.