मुंबई ः पुढारी ऑनलाईन
बाॅलिवुडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर हिच्याबद्दल ट्विटरवर #BoycottKareenaKhan नावाचा ट्रेंड सुरू झालेला आहे. हा ट्विटर ट्रेंड सुरू होण्यामागे करिनाचा आगामी 'रामायण' नावाचा चित्रपट आहे. या चित्रपटात ती 'सीते'च्या भूमिकेत दिसणार आहे. यावरू जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. #BoycottKareenaKhan हॅशटॅग वापरून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे.
नेटकरी नाराज व्हायचं कारण असं की, करिना कपूर खानला रामायण चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'सीते'च्या भूमिकेसाठी संपर्क केला. तर, करिनाने १२ कोटींचे मानधान मागितले. हे मान इतर चित्रपटांच्या मानधनाच्या तुलनेच सर्वात जास्त असल्याचे सांगितले जात आहे. याच मुद्द्यावरू नेटकऱ्यांनी #BoycottKareenaKhan ट्रेंड चालवत करिनाला ट्रोल केलेले आहे.
या चित्रपटाचे लेखक विजेंद्र प्रसाद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, करिनाला या चित्रपटासाठी कोणतीही ऑफर दिलेली नाही. यापूर्वी रामायण या चित्रपटासाठी हृतिक रोशन राम म्हणून आणि दीपिका पादुकोन ही सिता म्हणून भूमिका साकारणार असल्याची चर्चा होती. पण, सध्या या चित्रपटाबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही.